SBI Bank Robbery : महाराष्ट्र हादरला..! स्टेट बँकेवर भरदिवसा सशस्त्र दरोडा; तब्बल 30 कोटींचा मुद्देमाल लंपास
SBI Bank Robbery : जळगाव तालुक्यातील भोकर येथील भारतीय स्टेट बँकेच्या (SBI) शाखेवर शनिवारी भरदुपारी पडलेल्या सशस्त्र दरोड्याने संपूर्ण जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्र हादरला आहे.

SBI Bank Robbery : भरदिवसा बँकेत घुसले, कर्मचाऱ्यांना शस्त्राचा धाक दाखवला, गोळीबार केला आणि कोट्यवधींचं सोनं अन् लाखोंची रोकड घेऊन पसार झाले. जळगाव जिल्ह्यातील भोकर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत घडलेल्या या थरारक घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. (SBI Bank Robbery)
दरोडेखोरांनी तब्बल ३० कोटी रुपयांचे सोने आणि १२ लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, दरोडेखोरांचा डाव फार काळ यशस्वी ठरला नाही. बँक कर्मचारी, पोलीस आणि गावकऱ्यांनी त्यांचा पाठलाग केला. (SBI Bank Robbery)
या पाठलागादरम्यान काही आरोपींना पकडण्यात यश आले असून, पोलिसांनी त्यांच्याकडून चार बॅगाही जप्त केल्या आहेत. आता या दरोड्यामागे नेमकं कोण आहे? आणखी किती आरोपी फरार आहेत? याचा तपास सुरू आहे. (SBI Bank Robbery)
भरदिवसा बँकेत घुसले दरोडेखोर; कर्मचाऱ्यांना शस्त्राचा धाक
जळगाव तालुक्यातील भोकर गावात शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत काही सशस्त्र दरोडेखोर अचानक शिरले. त्यांनी बँकेतील कर्मचाऱ्यांना शस्त्राचा धाक दाखवत धमकावले. (SBI Bank Robbery)
दरोडेखोरांनी बँक कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यानंतर बँकेतील सोने आणि रोकड लुटण्यास सुरुवात केली. काही क्षणांतच कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल घेऊन दरोडेखोरांनी बँकेतून पळ काढला. (SBI Bank Robbery)
या घटनेमुळे बँक परिसरात एकच गोंधळ उडाला. भरदिवसा बँकेवर सशस्त्र दरोडा पडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. (SBI Bank Robbery)
३० कोटींचं सोने आणि १२ लाखांची रोकड लंपास?
प्राथमिक माहितीनुसार, दरोडेखोरांनी बँकेतून तब्बल ३० कोटी रुपयांचे सोने आणि १२ लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची माहिती समोर आली आहे. (SBI Bank Robbery)
मात्र, बँकेतून नेमके किती सोने आणि किती रोकड चोरीला गेली, याची अधिकृत मोजदाद अद्याप सुरू आहे. त्यामुळे लुटलेल्या मुद्देमालाचा अंतिम आकडा तपासानंतर स्पष्ट होणार आहे. (SBI Bank Robbery)
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. बँकेतील सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि घटनास्थळावरील पुराव्यांच्या आधारे तपास केला जात आहे. (SBI Bank Robbery)
गावकऱ्यांनी केला सिनेस्टाईल पाठलाग; आरोपींना पकडलं
दरोडेखोर बँकेतून मुद्देमाल घेऊन पळून जात असल्याची माहिती मिळताच गावकऱ्यांनी आणि पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. या पाठलागादरम्यान विदगावजवळ एक आरोपी आढळून आला. संतप्त नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. यावेळी दरोडेखोरांकडील रोकड आणि बॅगाही पोलिसांनी हस्तगत केल्याची माहिती आहे. (SBI Bank Robbery)
या प्रकरणात चार आरोपींना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, काही आरोपी अद्याप फरार असल्याची शक्यता असून, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. (SBI Bank Robbery)
चार आरोपी ताब्यात; पोलिसांकडून कसून चौकशी
या प्रकरणी जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांनी माहिती दिली आहे. भोकर येथील एसबीआय शाखेत चार जणांनी सशस्त्र दरोडा घातल्याची माहिती त्यांनी दिली. (SBI Bank Robbery)
पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून चार बॅगा जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपींची कसून चौकशी सुरू आहे. दरोड्यात किती सोने चोरीला गेले, आरोपींनी कोणत्या शस्त्रांचा वापर केला आणि या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास सुरू आहे. (SBI Bank Robbery)
या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहितीही पोलीस अधीक्षकांनी दिली. आरोपींची चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या नावांसह सविस्तर माहिती प्रसिद्ध केली जाणार आहे. (SBI Bank Robbery)
मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली घटनास्थळाची पाहणी
दरम्यान, भोकर येथील स्टेट बँकेवर झालेल्या दरोड्याची माहिती मिळताच मंत्री गुलाबराव पाटील यांनी बँकेला भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. भरदिवसा बँकेवर सशस्त्र दरोडा पडल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या घटनेचा तपास पोलिसांकडून सुरू असून, फरार आरोपींचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. (SBI Bank Robbery)




