satara | हृदयाचा त्रास जाणवल्याने सयाजी शिंदे रुग्णालयात दाखल

सातारा,(प्रतिनिधी) – प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांना हृदयाचा त्रास जाणवू लागल्यानंतर साताऱ्यातील एका खाजगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे. गुरुवारी त्यांचावर एन्जोप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. छातीत दुखत असल्याने त्यांचा काही तपासण्या करण्यात आल्या.
त्यात त्यांचा हृदयाची एक व्हेन ब्लॉक असल्याचे समजल्या नंतर तात्काळ एन्जिओप्लास्टी करण्यात आली. सध्या त्यांची प्रकृती व्यवस्थित असून दोन दिवसात त्यांना डिस्चार्ज दिला जाणार असल्याचे हृदयविकार तज्ञ डॉ. सोमनाथ साबळे यांनी सांगितले आहे.
सयाजी शिंदे हे सतत त्यांच्या चित्री करणाच्या कामात व्यस्त असतात. ते मराठीसह हिंदी तामिळ कन्नड भोजपुरी आदी चित्रपटात काम करत असतात. सतत ते त्यांच्या सह्याद्री देवराई या वनराईच्या प्रकल्पातही ते व्यस्त असतात. वनराईच्या वेगवेगळ्या उपक्रमाची माहिती घेण्यासाठी देशभर फिरत असतात. त्यांना मागील काही दिवसांपासून हृदयाचा थोडासा त्रास जाणवू लागला होता.
त्यांची तपासणी केली असता त्यांना किरकोळ त्रास असल्याची दिसून आले. त्याची कल्पना त्यांना देण्यात आली. त्यानंतर त्यांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आले असून त्यांना उद्या रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार आहे. पुढील आठवड्यापासून ते त्यांच्या नियमित कामाला सुरुवात करू शकतील असे डॉ सोमनाथ साबळे यांनी सांगितले.





