Sanjay Raut : “नमो नमो किंवा जय श्रीराम म्हणा, म्हणजे सर्व समस्या सुटतील”; संजय राऊतांचं अजब विधान
Sanjay Raut : देशभरात सिलेंडर्सचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकावर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच त्यांनी एक मोठी मागणी देखील केली आहे.

Sanjay Raut : गेल्या काही दिवसांपासून इराण-इस्राइल या देशात युद्ध सुरू असून, या युद्धाची झळ भारतीयांना बसू लागली आहे. युद्धामुळे कच्चे तेल आणि एलपीजीचे संकट ओढावले आहे.
भारताकडून या संकटाचा सामना करण्यासाठी इतर पर्यांयाचा विचार सुरू आहे. पण सध्याच्या घडीला घरगुती गॅस सिलेंडरचे दर वाढले असून, सिलेंडर्सचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे सिलेंडर्स घेण्यासाठी नागरिकांच्या भल्या मोठ्या रांगा लावल्याचे चित्र विविध ठिकाणी पाहायला मिळत आहे. Sanjay Raut
आता तर काही ठिकाणी पोलिस बंदोबस्तात सिलेंडर्सने भरलेले वाहन पोहचवले जात आहे. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ग्राहकांना सिलेंडर उपलब्ध होत नसल्याने मोठे हाल होत आहेत.
या ओढवलेल्या परिस्थितीवर उद्धव ठाकरे सेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी एक अजब सल्ला दिला आहे. “नमो नमो किंवा जय श्रीराम म्हणा, म्हणजे सर्व समस्या सुटतील,” असा अजब सल्ला संजय राऊत यांनी दिला आहे.
तसेच या परिस्थितीवर भाष्य करताना संजय राऊत यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केले आहे. गॅस पुरवठा विस्कळित झाल्याबद्दल त्यांनी सरकारच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
संजय राऊत काय म्हणाले? Sanjay Raut
“देशात अशी गंभीर परिस्थिती असताना पंतप्रधान प्रचारासाठी केरळ आणि तामिळनाडू येथे कसे व्यस्त राहू शकतात. देशात गॅस टंचाईसारखे महत्त्वाचे प्रश्न असताना सरकारचे लक्ष निवडणुकांवर अधिक दिसत आहे. ‘नमो नमो किंवा जय श्रीराम म्हणा, म्हणजे सर्व समस्या सुटतील आणि पेट्रोल-डिझेलही घरपोच मिळेल.’ देशातील वाढत्या अंधभक्तीमुळे खऱ्या समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे.”
एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने हॉटेल व्यावसायिकांवर मोठं संकट उभे ठाकले आहे. अनेकांचे व्यवसाय अडचणीत सापडले आहेत. सामान्य नागरिकांना देखील मोठी झळ सोसावी लागत आहे. अनेक गॅस एजन्सींच्या बाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. काही ठिकाणी बुकिंग करूनही गॅस सिलेंडर वेळेवर मिळत नसल्याची तक्रार नागरिक करत आहेत. गॅस टंचाईचा प्रश्न लवकर सोडवावा, अशी मागणी संजय राऊत यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.






