#SAvIND 1st ODI : धवनची अनोखी कामगिरी
Updated On:

पार्ल – भारताचा अनुभवी सलामीवीर शिखर धवनने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत संघात पुनरागमन केले. त्याने पहिल्या सामन्यात 79 धावांची खेळी करताना एका अनोख्या कामगिरीची नोंद केली.
धवनने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू हेडन, इंग्लंडचा ज्यो रुट आणि न्यूझीलंडचा केन विल्यमसन यांना मागे टाकले.
रुटने 152 एकदिवसीय सामन्यात 6 हजार 109, हेडनने 161 सामन्यात 155 डावात 6 हजार 133 व विल्यमसनने 151 सामन्यात 6 हजार 176 धावा केल्या आहेत. धवनने 79 धावांच्या खेळीसह 6 हजार 184 धावा केल्या आहेत.
त्याने भारताकडून आतापर्यंत 146 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यातील 143 डावात फलंदाजी करण्याची संधी त्याला मिळाली. त्याने एकदिवसीय सामन्यात 17 शतकं आणि 34 अर्धशतके फटकावली आहेत.





