सावी चित्रपटाची वर्षपूर्ती! अभिनेत्री दिव्या कोसलाने दिला आठवणींना उजाळा; म्हणाली “ही भूमिका साकारणं….”

Actress Divya Khosla : अभिनेत्री दिव्या खोसला हिला सावी चित्रपटाने मोठी प्रसिद्ध मिळवून दिली. आज या चित्रपटाला एक वर्ष पूर्ण झाले असून दिव्याने चित्रपटाबद्दच्या आठवणींना उजाळा दिला आहे. सावीमध्ये दिव्याने साकारलेल्या पात्राला प्रक्षेकांनी भरभरून प्रेम दिले. तिने या चित्रपटात केलेल्या जबदरदस्त अभिनयाने प्रेक्षकांना स्क्रिनवर खिळवून ठेवले. या चित्रपटाने दिव्याला केवळ मुख्य भूमिका देली नाही तर तिच्या करिअरमध्ये टर्मिंग पॅाईंट दिला. ज्यामुळे तिने प्रेक्षकांच्या मनात आपलं अढळ स्थान निर्माण केले आहे.
दिव्या सावी या प्रोजेक्टचा उत्सव साजरा करत आहे. सावी चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनय देव यांनी केले आहे. या चित्रपटात दिव्याने एका गृहिणीची भूमिका साकारली होती, जी आपल्या पतीवर लावण्यात आलेल्या खोट्या खुनाच्या आरोपाविरोधात हार मानत नाही. सावीमधील साकारलेल्या पात्राबाबत दिव्या म्हणाली हे पात्र साकारणं तिच्यासाठी खूप आव्हानात्मक होतं.
View this post on Instagram
सावी माझ्या मनाच्या खूप जवळची आहे आणि कायम खास राहील. असं वाटतंय की कालच आपण हर्षवर्धन राणे, अनिल कपूर आणि आमचे दिग्दर्शक अभिनय देव यांच्यासोबत शूटिंग करत होतो. सावीचं पात्र साकारणं खूप आव्हानात्मक होतं, पण मला हे पात्र करायचंच होतं, एक पत्नी तिच्या नवऱ्यासाठी कुठल्याही टोकाला जाऊ शकते, हे दाखवायचं होतं, असे तिने सावी चित्रपटाच्या साकारेल्या भूमिकेच्या बाबतीतील आठवण सांगितली.
दिव्या खोसला तिच्या आगामी प्रोजेक्टविषयी चर्चेत आहे. ती दिग्दर्शिका प्रेरणा अरोरा यांच्यासोबत एका नव्या प्रोजेक्टवर काम करत आहे. या नव्या प्रोजेक्टचं नाव जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र, प्रेक्षकांमध्ये या जोडीला घेऊन नव्या प्रोजेक्टबद्दल मोठी उत्सुकता आहे.
हेही वाचा: दिशा पटानीला लागली लॅाटरी…. आता थेट हॅालीवूडमध्ये एन्ट्री! ‘या’ जबरदस्त अॅक्शन चित्रपटात दिसणार





