#SAvAUS T20I Series : ऑस्ट्रेलियाचा आफ्रिकेेला व्हाइटवॉश; अखेरच्या सामन्यात 5 विकेट्सनेे विजय..

जोहान्सबर्ग :- ऑस्ट्रेलिया संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन टी-20 सामन्यात निर्विवाद वर्चस्व राखले. ही मालिका 3-0 अशी जिंकताना कांगारुंनी दक्षिण आफ्रिका संघाला व्हाइटवॉश दिला.
तिसरा सामना जिंकत थोडीफार प्रतिष्ठा राखण्याची संधीही दक्षिण आफ्रिकेला मिळवता आली नाही. अखेरच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदा फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 191 धावांचे आव्हान ठेवले होते. ऑस्ट्रेलियाने 5 विकेट गमावत 18 षटकांतच हे लक्ष्य पूर्ण करत विजयासह मालिकाही जिंकली.
ऑस्ट्रेलियाकडून ट्राविस हेड याने 48 चेंडूत सर्वाधिक 91 धावांची खेळी केली. आता ऑस्ट्रेलियाचा संघ याच महिन्याच्या अखेरीस भारतात भारतीय संघाविरुद्ध एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार असून दोन्ही संघांना एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेपूर्वी चांगला सराव या मालिकेद्वारे मिळणार आहे.





