Money Laundering Case : सत्येंद्र जैन यांच्या जामीन मुदतीत 1 सप्टेंबरपर्यंत वाढ…
Updated On:

नवी दिल्ली :- दिल्लीचे माजी मंत्री सत्येंद्र जैन यांच्या अंतरिम जामीनला सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. न्यायमूर्ती एएस बोपण्णा आणि एमएम सुंदरेश यांच्या खंडपीठाने जैन यांच्या वैद्यकीय अहवालाची दखल घेत त्यांना दिलासा दिला.
आज झालेल्या सुनावणीच्यावेळी अतिरीक्त सॉलिसिटर जनरल यांनी त्यांच्या जामीनाला मुदतवाढ देण्यास कडाडून विरोध केला. 26 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने जैन यांना वैद्यकीय कारणास्तव सहा आठवड्यांसाठी अंतरिम जामीन मंजूर केला होता.
ईडीने गेल्या वर्षी 30 मे रोजी जैन यांना चार कंपन्यांच्या माध्यमातून मनी लॉंड्रिंग केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. सीबीआयने नोंदवलेल्या गुन्ह्यात त्यांना 6 सप्टेंबर 2019 रोजी ट्रायल कोर्टाने नियमित जामीन मंजूर केला होता.





