सत्यपाल मलिक यांचा रुग्णालयातील फोटो व्हायरल ; स्वतःच पोस्ट करत दिली तब्बेतीची माहिती

Satyapal Malik in hospital । जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांची प्रकृती खालावली असून त्यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ११ मे पासून रुग्णालयात दाखल असलेल्या मलिकने स्वतः इंस्टाग्रामवर एका पोस्टद्वारे ही माहिती शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी त्याचा एक फोटो देखील पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ते हॉस्पिटलच्या बेडवर उपचार घेताना दिसत आहे.
सीबीआयने कालच सत्यपाल मलिक आणि इतर ६ जणांविरुद्ध भ्रष्टाचार प्रकरणात आरोपपत्र दाखल केले आहे. हे प्रकरण २,२०० कोटी रुपयांच्या किरू जलविद्युत प्रकल्पाच्या बांधकाम कंत्राटांमधील कथित भ्रष्टाचाराशी संबंधित आहे.
सत्यपाल मलिक यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी,”मला माझ्या अनेक हितचिंतकांचे फोन येत आहेत जे मी उचलू शकत नाही. माझी प्रकृती सध्या खूप वाईट आहे. मी कोणाशीही बोलण्याच्या स्थितीत नाहीये. मी ११ मे पासून राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल आहे. ” असे त्यांनी म्हटले आहे. या पोस्टमध्ये त्यांनी त्यांचा एक फोटो देखील शेअर केला आहे ज्यामध्ये त्यांच्या आजाराचे गांभीर्य लक्षात येते. संसर्गाच्या तक्रारीमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता प्रकृती खूपच गंभीर आहे आणि गेल्या तीन दिवसांपासून किडनी डायलिसिस केले जात आहे.
नमस्कार साथियों।
मेरे बहुत से शुभचिंतकों के फ़ोन आ रहे हैं जिन्हें उठाने में मैं असमर्थ हूं।अभी मेरी हालत बहुत खराब है मैं किसी से भी बात करने की हालत में नहीं हूं। 11 मई से राम मनोहर लोहिया अस्पताल में भर्ती हू। संक्रमण की शिकायत के चलते अस्पताल में भर्ती किया गया था। अब… pic.twitter.com/yTWGxuHkyC— Satyapal Malik (@SatyapalMalik6) May 22, 2025
मूत्रपिंड निकामी झाले Satyapal Malik in hospital ।
सत्यपाल मलिक यांना मूत्र संसर्गाशी संबंधित गंभीर गुंतागुंतीमुळे गंभीर अवस्थेत दिल्लीतील डॉ. राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर आता त्यांच्या दोन्ही किडन्या निकाम्या झाल्या असल्याची माहिती समोर आली आहे.
डॉ. मलिक यांना ११ मे रोजी तीव्र वेदना आणि लघवी करण्यास त्रास होत असल्याची तक्रार केल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या एका जवळच्या सहकाऱ्याने पुष्टी केली आहे की त्यांच्या दोन्ही किडन्यांनी काम करणे थांबवले आहेत आणि त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. आरएमएल रुग्णालयातील एका वरिष्ठ डॉक्टरने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, “सुरुवातीला त्यांना मूत्र संसर्ग झाला होता, परंतु आता या संसर्गामुळे मूत्रपिंडांना गंभीर नुकसान झाले आहे. आम्ही सर्व शक्य उपचार करत आहोत, परंतु स्थिती खूप गंभीर आहे.”
मलिक यांच्यावर कोणते आरोप आहेत? Satyapal Malik in hospital ।
सीबीआयच्या आरोपपत्रानुसार, प्रकल्पाशी संबंधित निविदा प्रक्रियेत अनियमितता आणि काही कंपन्यांना जाणूनबुजून पक्षपात केल्याचे आरोप आहेत. जम्मू आणि काश्मीरमधील विकासासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जातो. फेब्रुवारी २०२४ मध्ये, सीबीआयने त्यांच्या तपासादरम्यान, सत्यपाल मलिक यांच्या दिल्लीतील निवासस्थाने आणि जम्मू आणि काश्मीरमधील परिसरांसह ३० हून अधिक ठिकाणी झडती घेतली होती.
किरू जलविद्युत प्रकल्प जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यात आहे. हा प्रकल्प चिनाब व्हॅली पॉवर प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड (CVPPPL) द्वारे राबविला जात आहे. सीबीआयच्या तपासानुसार, प्रकल्पाच्या सिव्हिल कामांच्या निविदा प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आली. सीव्हीपीपीपीएलच्या ४७ व्या बोर्ड बैठकीत ई-टेंडरिंग आणि रिव्हर्स ऑक्शनद्वारे पुन्हा निविदा प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता, परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्याऐवजी, हे कंत्राट थेट पटेल इंजिनिअरिंग लिमिटेडला देण्यात आले.





