Satyajeet Tambe : सत्यजित तांबे यांना पोलिसांनी घेतले ताब्यात; आंदोलनावेळी नेमकं काय घडलं?
Satyajeet Tambe : सत्यजित तांबे यांना ताब्यात घेऊन पोलिसांच्या गाडीत नेताना आंदोलनकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी बरीच झटापट झाली.

Satyajeet Tambe : आताच्या घडीची एक मोठी बातमी समोर आली आहे. विधानपरिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुणे-नाशिक हायस्पिड रेल्वे प्रकल्प मूळ मार्गावर करण्यात यावी, त्यात कोणताही बदल करण्यात येऊ नये या मागणीसाठी आज पुणे नाशिक महार्गावर ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे.
या आंदोलनात सत्यजित तांबे देखील सहभागी झाले होते. त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतल्याने आंदोलनकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून पोलिसांची गाडी अडवण्याचा प्रत्यत्न करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. सत्यजित तांबे यांना ताब्यात घेऊन पोलिसांच्या गाडीत नेताना आंदोलनकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी बरीच झटापट झाली.
१६ हजार कोटींच्या या रेल्वे प्रकल्पाच्या मूळ मार्गात बदल केल्याने अहिल्यानगरकरांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. या निर्णायावर आमदार सत्यजित तांबे यांनी विधानपरिषदेत विरोध दर्शवत निर्णयात बदल करण्यात यावी अशी मागणी केली होती. मात्र, निर्णय न झाल्याने शेवटी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात आले.
पुणे-नाशिक रेल्वेचा मार्ग खेड मंचर नारायणगाव या भागातून झाला पाहिजे, या मागणीसाठी आज चाकण, मंचर ,नारायणगाव आळेफाटा चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. सरकारला लोकांच्या मनातील भावना सांगायच्या असतील तर रस्त्यावर उतरावं लागेल, अशी भूमिका सत्यजित तांबेंनी घेतल्याचे बघायला मिळाले.





