सत्तार शेख यांची क्रांतीसुर्य गटसचिव संघटनेच्या जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड

जामखेड – क्रांतीसूर्य गटसचिव संघटनेची अहमदनगर येथे शनिवारी बैठक पार पडली ही बैठक नगर तालुका देखरेख संघ या ठिकाणी घेण्यात आली. या बैठकीत अहमदनगर जिल्हा गटसचिव संघटनेची नवीन कार्यकारणीची निवड करण्यात आली त्यामध्ये जामखेड तालुक्यातील जवळा गावचे सुपुत्र व नान्नज विविध सहकारी कार्यकारी सोसायटीचे सचिव सत्तार शेख यांची जिल्हा कार्याध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली . सहकार क्षेत्रातील अभ्यासू व हुशार व्यक्तिमत्त्व अशी त्यांची ओळख आहे. ते सचिव या पदावर गेले 28 वर्षापासू या क्षेत्रात कार्यरत आहेत आहेत.

राजकीय ,सामाजिक व सहकार क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत स्वतःची ओळख निर्माण केली आहे.तसेच जामखेड तालुका सचिव संघटना हे ही पद ते निष्ठेने व जबाबदारीने पार पाडत आहेत.झालेल्या या निवडीबद्दल अहमदनगर जिल्हा बँकेचे संचालक जगन्नाथ राळेभात विशेष अभिनंदन केले.सहकार संस्थेतील चेरमान, जामखेड तालुक्यातील सर्व सचिव कर्मचारी तसेच राजकीय,सामाजिक अश्या विविध स्तरावरून त्यांचे अभिनंदन होत आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×