Satara : मे महिन्यातच ठोसेघर धबधबा कोसळू लागला…
Updated On:

ठोसेघर : प्रसिध्द ठोसेघर धबधबा हे पावसाळी पर्यटनातील अबालवृध्दांचा जिव्हाळ्याचा विषय. मान्सून सुरु झाल्यानंतर जुलैमध्ये दरवर्षी कोसळणारा ठोसेघर धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत असते.
मात्र, यावर्षी मान्सूनपूर्व पावसाने लावलेल्या जोरदार हजेरीमुळे मे महिन्यातच ठोसेघर धबधबा कोसळू लागला असून या जलधारांचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची पावले वळाली आहेत. त्यामुळे धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होवू लागलीय.





