सातारा | मजुराला मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ

राहुरी | शेतात पाणि भरण्यासाठी असलेल्या मजूराला गव्हू देण्यास नकार देऊन दगडाने मारहाण करुन जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली. ही घटना राहुरी तालूक्यातील मानोरी येथे दि. २० मे २०२४ रोजी घडली. याबाबत राहुरी पोलिस ठाण्यात चार जणांवर गून्हा दाखल करण्यात आला.
छबु देवराम मोरे, वय ४५ वर्षे, हे श्रीगोंदा तालूक्यातील चांडगाव येथील रहिवाशी असून ते मागील तीन महिन्यापासुन राहुरी तालूक्यातील मानोरी रुपेश तनपुरे याच्या शेतामधील गव्हाच्या पिकांला पाणी भरण्यासाठी एकरी आडीच पोते या प्रमाणे मजुरीवर काम करत होते. त्यांनी एकुण ५ एकर शेतातील गव्हांचे पिकांला पाणी भरले होते. दि. २० मे २०२४ रोजी छबू मोरे हे त्यांच्या वाट्याचे साडेबारा पोते गव्हू आणण्यासाठी शेती मालक रुपेश तनपुरे यांच्या घरी गेले होते. त्यांनी रुपेश तनपूरे यास कामाच्या मोबदल्याचे साडेबारा पोते गहु मागितले. त्यावेळी दोघांमध्ये वाद निर्माण झाला. आणि रुपेश तनपूरे व इतर आरोपींनी छबू मोरे यांना दगडाने मारहाण करुन जातीवाचक शिवीगाळ केली.
छबु देवराम मोरे यांच्या फिर्यादीवरून आरोपी रुपेश तनपुरे, रा. मानोरी, ता. राहुरी, व इतर तीन अनोळखी इसम अशा चार जणांवर गून्हा रजि. नं. ६३५/२०२४ भादंवि कलम ३२३, ३२४, ५०४, ५०६ तसेच अनुसूचीत जाती आणि अनुसूचीत जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम, १९८९ चे कलम ३(१) (आर), ३(१) (एस), ३(२) (व्हिए) प्रमाणे मारहाण व ॲट्रोसीटी अंतर्गत गून्हा दाखल करण्यात आला.





