Satara: अभिलाषा वाघमारे हिला नंदा जाधव स्मृती पुरस्कार प्रदान
Satara उपनगराध्यक्ष अॅड. दत्ता बनकर यांनी नंदा जाधव यांचे कर्तृत्व आपण लहानपणापासून पाहिले असल्याचे सांगून खा. उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सातारा व परिसरात क्रीडा क्षेत्राला पूरक मैदाने उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नंदा जाधव यांच्या स्मृतीप्रित्यर्थ क्रीडा संकुल उभारण्यासाठी निश्चितपणे पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले.

Satara: आंतरराष्ट्रीय धावपटू नंदा जाधव यांच्या 27 व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात नवोदित धावपटू अभिलाषा वाघमारे हिला डॉ. संदीप काटे आणि उपनगराध्यक्ष अॅड. दत्ता बनकर यांच्या हस्ते नंदा जाधव स्मृती पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. यावेळी आयोजित रक्तदान शिबिरात 140 जणांनी रक्तदान केले.
सातारा हिल मॅरेथॉनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संदीप काटे यांनी नंदा जाधव या सातार्यातील पहिल्या आंतरराष्ट्रीय धावपटू असल्याचे सांगत त्यांच्या स्मृती जपण्यासाठी परिसरात क्रीडा संकुल उभारण्यात यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. रनर फाउंडेशनच्या माध्यमातून मॅरेथॉनविषयक कायमस्वरूपी दालन उभारण्याचा मानस असून, त्यामध्ये नंदा जाधव यांनी मिळवलेल्या विविध पुरस्कारांचे जतन करण्यात येणार आहे. या माध्यमातून नवोदित खेळाडूंना प्रेरणा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उपनगराध्यक्ष अॅड. दत्ता बनकर यांनी नंदा जाधव यांचे कर्तृत्व आपण लहानपणापासून पाहिले असल्याचे सांगून खा. उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सातारा व परिसरात क्रीडा क्षेत्राला पूरक मैदाने उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नंदा जाधव यांच्या स्मृतीप्रित्यर्थ क्रीडा संकुल उभारण्यासाठी निश्चितपणे पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले.
प्रतिष्ठानचे सचिव सुरेश साधले यांनी प्रास्ताविकात नंदा जाधव यांच्या क्रीडा कारकिर्दीचा आढावा घेतला. उपाध्यक्ष टी. आर. गारळे आणि आनंदराव कणसे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रवीण जाधव, संभाजीनगरचे सरपंच सतीश माने, उपसरपंच काशिनाथ गोरड, नितीन पाटील, सुजीत चावरे, महेश कदम, गिरीश ढेंबरे, उमेश कांबळे, राम कदम, राजेंद्र कामटे, अॅड. सागर जाधव, संजय गायकवाड, महेश जाधव, रमेश हलगेकर, अमोल तांगडे, महेश गडकरी, एचडीएफसी बँकेचे कुलकर्णी, अर्चना देशमुख, हेमंत शिंदे, श्रीकांत देशमुख, किशोर मोरे, जगदाळे यांच्यासह मान्यवर व नागरिक उपस्थित होते. श्रीकांत देशमुख यांनी आभार मानले.





