Satara : श्री आनंद नटराज-शिवकाम सुंदरी देवीच्या लग्नसोहळा उत्साहात

सातारा : येथील श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिरातील सर्व देवतांचा वार्षिक रथोत्सव सोहळा कल्याणोत्सवाने संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी संपूर्ण राज्यातूनच नव्हे तर देश परदेशातून शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. नटराज मंदिरामध्ये सोमवारी सकाळी 5 ते12 या वेळेत श्री आनंद नटराज आणि शिवकाम सुंदरी देवी यांच्या पंचधातूच्या भव्य मूर्ती रविवारी संपन्न झालेल्या रथोत्सव सोहळ्यानंतर नटराज मंदिरामध्ये गाभाऱ्या पुढील कट्ट्यावर ठेवण्यात आल्या. त्यानंतर मंदिराचे ब्रह्मवृंदांनी या दोन्ही मूर्तींना विशेष अभिषेक घालून महाभिषेक केला.
रथसोहळ्याची सांगता सोमवार दि. 13 जानेवारी रोजी पहाटे पाच ते दुपारी बारा या वेळेत पुणे येथील राधाकृष्ण शास्त्री मेमोरियल ट्रस्टच्या वतीने श्री नटराज देवाला महाअभिषेक, लघुरुद्र व शिवकाम सुंदरी व नटराज यांचा कल्याणोत्सवाने आज करण्यात आली. दोन्ही मूर्तींना विशेष अभिषेक घातल्यानंतर चंदनचा सुशोभित केलेला असा भव्य हार घालण्यात आला.
विविध अलंकार आणि विविध सुवासिक फुलांच्या हार आदींनी या मूर्तींना सजविण्यात आले. त्यानंतर मंगलाष्टका म्हणत ब्रह्मवृंदांनी या दोन्ही मूर्तींमध्ये अंतरपाट धरून लग्न सोहळा संपन्न केला. सुवासिनींनी नटराज आणि पार्वती देवीची दृष्ट काढून सर्वांच्या कल्याणासाठी आणि रक्षणासाठी प्रार्थना केली.
यावेळी पुणे येथील श्री सत्य साई निकेतन हायस्कूल आणि वसुंधरा ग्रीन बायो एनर्जीचे चेअरमन सुदर्शन मुदलियार, सौ. विजयालक्ष्मी मुदलियार, व्यवस्थापकीय विश्वस्त रमेश शानभाग, सौ. उषा शानभाग, नारायण राव, वासुदेव नायर, व्यवस्थापक चंद्रन, संकेत शानभाग, राहुल घायताडे, रमेश हलगेकर ,मोहन शानभाग, सौ.प्रभा भट, अभिनव भट, सुहास शहाणे, सौ. कांचन शहाणे, राधाकृष्ण मेमोरियल ट्रस्टचे पदाधिकारी विश्वस्त उपस्थित होते .





