सातारा । समाजभुषण पुरस्कारने शिवशंकर चापुले सन्मानित

पुसेगाव – बुध, ता. खटाव येथील सर्वोदय सामाजिक संस्थाव श्री नागनाथ विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने लातूरचे पर्यावरणप्रेमी शिवशंकर चापुले यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पाच हजार रुपये रोख स्मृतिचिन्ह व शाल श्रीफळ व आंब्याचे रोप असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
शिवशंकर चापुले म्हणाले, आत्तापर्यंत तीनशे प्रकारच्या वेगवेगळ्या वनस्पतीच्या बियांचे लागवड करून रोपण करून मोफत त्याचा प्रचार व प्रसार करून ते जगण्यासाठी व झाडे लावण्यासाठी प्रयत्न केले आहे. त्यामुळे त्या वनस्पतीचे महत्व समाजापर्यंत पोहोचण्याचे काम करत आहेत. पर्यावरणाचा संतुलन राखण्यासाठी विविध वनस्पतीची माहिती घेऊन व त्याचे औषधी महत्त्व लक्षात घेऊन वनस्पतींची लागवड करणे आवश्यक आहे.
प्राचार्य डॉ. संजय कांबळे म्हणाले, शिवशंकर चापुले यांनी केलेल्या कार्याचा गौरव आहे असे म्हटले व समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. सर्वोदय सामाजिक संस्था करीत असलेले कार्य अतिशय कौतुकास्पद आहे.
यावेळी विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते आंब्याचे रोप देऊन व पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास काटेवाडीच्या सरपंच शुभांगी कोरडे, उपसरपंच शिवाजीराव लावंड, उद्योजक मंगेश नलवडे, नितीन गाडे, राजेंद्र भिसे, बाबासाहेब इनामदार व डॉ. संदीप माळी, सौ लक्ष्मी इंगळे, रूपाली इंगळे व सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.
सौ. दीपमाला जगदाळे व सौ प्राजक्ता इंगळे यांनी सूत्रसंचालन केले. भगवान सरवदे यांनी स्वागत केले. .जीवन इंगळे यांनी आभार मानले.
यावेळी शिवशंकर चापुले यांनी पांढऱ्या पळसाच्या बिया संस्थेला लावण्यासाठी जीवन इंगळे यांच्याकडे दिल्या. यावेळी विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.





