Satara : फलटण तालुक्यातील १३१ ग्रामपंचायतींचे सरपंच आरक्षण निश्चित

फलटण : फलटण तालुक्यातील १३१ ग्रामपंचायतींचे सरपंच आरक्षणे सोडतीद्वारे निश्चित करण्यात आली. यावेळी प्रांताधिकारी सौ. प्रियंका आंबेकर, तहसीलदार डॉ. अभिजित जाधव, निवासी नायब तहसीलदार अभिजित सोनवणे, गुंजवटे, शबाना बागवान, तलाठी संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण अहिवळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी अनुसूचित जाती जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, महिला राखीव आणि खुल्या प्रवर्गाची आरक्षणे कशी व किती काढण्यात येणार याविषयी माहिती दिली. विविध गावचे आजी माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
या आरक्षण सोडतीद्वारे अनुसूचित जमाती १, अनुसूचित जाती महिला १०, अनुसूचित जाती सर्वसाधारण ९, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव १८, नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण १७, खुला महिला राखीव ३८ आणि सर्वसाधारण ३८ अशी एकूण १३१ ग्रामपंचायत आरक्षणे निश्चित केली.
सोडतीद्वारे निश्चित करण्यात आलेली आरक्षणे व गावे : अनुसूचित जमाती सर्वसाधारण – ढवळेवाडी (आसू). अनुसूचित जाती महिला राखीव पवारवाडी, विंचुर्णी, आसू, मुंजवडी, दालवडी, शिंदेनगर, खुंटे, राजुरी भवानीनगर, हणमंतवाडी, सस्तेवाडी. अनुसूचित जाती सर्वसाधारण- जिंती, वेळीशी, गोखळी, सरडे, निंभोरे, गुणवरे, निंबळक खामगाव, निरगुडी. नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव – झडकबाईचीवाडी, शेरेशिंदेवाडी, धुळदेव, गोळेवाडी, ठाकूरकी, भाडळी बुद्रुक, सोनवडी बुद्रुक, काशिदवाडी, तरडगाव, वाखरी, बोडकेवाडी, खडकी, फरांदवाडी, बरड, धुमाळवाडी, मिरगाव, शिंदेमाळ, तांबवे. नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण – मलवडी, कुसूर, उपळवे, पाडेगाव, आदर्की बुद्रुक, रावडी बुद्रुक, साठे, तरडफ, हिंगणगाव, राजाळे, जोर (कुरवली खुर्द), मठाचीवाडी, नाईकबोमवाडी, वाघोशी, घाडगेमळा,
आदर्की खुर्द, सोनगाव. खुला प्रवर्ग महिला राखीव- जावली, ढवळ, भिलकटी, झिरपवाडी, साखरवाडी, भाडळी खुर्द, कुरवली खुर्द, शिंदेवाडी, आळजापूर, वडले, चौधरवाडी, आंदरूड, खराडेवाडी, सोमंथळी, कांबळेश्वर, कापशी, आरडगाव, अलगुडेवाडी, रावडी खुर्द, काळज, ताथवडा, तडवळे, चांभारवाडी, सालपे, सासवड, तावडी, जाधववाडी (फ), मिरेवाडी (कुसूर), शेरेचीवाडी (ढवळ), घाडगेवाडी, माळेवाडी, ढवळेवाडी (निंभोरे), पिराचीवाडी, टाकूबाईचीवाडी, माझेरी, परहर बुद्रुक, परहर खुर्द, जोर ( वाखरी).
खुला सर्वसाधारण – सांगवी, गिरवी, खटकेवस्ती, सुरवडी, सासकल, होळ, कुरवली बुद्रुक दत्तनगर, विडणी, वडगाव, कापडगाव, सोनवडी खुर्द, टाकळवाडे, कोळकी, मुरुम, दुधेबावी, बिबी, पिंप्रद शेरेचीवाडी (हिंगणगाव), तिरकवाडी, नांदल, मिरढे, फडतरवाडी, चव्हाणवाडी, वाठार निंबाळकर, कोरेगाव, वडजल, जाधववाडी (आसू), मुळीकवाडी, मिरेवाडी (दालवडी), कोऱ्हाळे, डोंबाळवाडी, विठ्ठलवाडी, मानेवाडी, जाधवनगर, दऱ्याचीवाडी, सावंतवाडी, उळंब, गोळेगाव.





