Satara : सचिन यादव यांना शरद कृषी उद्योजक पुरस्कार प्रदान

फलटण : येथील के. बी. ग्रुप ऑफ कंपनीचे संचालक सचिन यादव यांना यंदाचा शरद कृषी उद्योजक पुरस्कार बारामती कृषी विज्ञान केंद्राचे कार्यकारी संचालक राजेंद्र पवार यांच्या हस्ते लोणंद येथे प्रदान करण्यात आला. यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते.
सचिन यादव यांनी कृषी क्षेत्रात तंत्रज्ञान, नवीन बियाणे आणि सिंचाई पद्धतींबाबत अनेक नवनवीन प्रयोग करून शेतकऱ्यांना फायदेशीर ठरेल असे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले असून यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन आणि आर्थिक स्थिती सुधारली असल्याचे प्रतिपादन बारामती कृषी विज्ञान केंद्राचे कार्यकारी संचालक राजेंद्र पवार यांनी केले.
राजेंद्र पवार म्हणाले, सचिन यादव हे कृषी क्षेत्रातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व आहे.त्यांनी के. बी. उद्योग समूहाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान व नवीन शेती पद्धतींबाबत मार्गदर्शन करून त्यांचे जीवन सुधारण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनात वाढ करण्यात आणि आर्थिक स्थिती सुधारण्यात मदत झाली आहे.





