Satara : कोडोलीत जुगार अड्ड्यावर छापा
Updated On:

सातारा : कोडोली गावाच्या कमानीसमोर असणाऱ्या आडोशाला जुगार घेणाऱ्या राजेंद्र सीताराम साळवे (वय 56, रा. प्रताप श्रीनगर, खेड) याला सातारा शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून तीनशे रुपये जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
हवालदार संतोष घाडगे यांनी गुरुवारी दुपारी पावणेचारच्या दरम्यान ही कारवाई केली. कोडोली परिसरात जुगाराचे प्रस्थ वाढल्याच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणाची माहिती घेऊन साळवे याला ताब्यात घेतले. त्याला नोटीस बजावण्यात आली आहे.





