Satara : खेळाडूंना निवड चाचणीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

सातारा : केंद्र शासनाच्या खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्र योजनेंतर्गत सातारा जिल्ह्यास मैदानी खेळाचे अनिवासी प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
हा प्रशिक्षण केंद्रांतर्गत राज्य, राष्ट्रीय खेळाडू निर्माण करण्याची कार्यवाही सकाळ व सायंकाळ सत्रात जिल्हास्तर देखरेख व नियंत्रण समिती, सातारा व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा यांच्या अधिपत्याखाली सुरु आहे.
खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्रामध्ये नव्याने खेळाडू नियुक्त करण्याची कार्यवाही सुरु असून, निवड चाचणीचे आयोजन दिनांक १२ जून रोजी करण्यात आले आहे.
तरी १० वर्षे पुर्ण ते १६ वर्षाच्या आतील जास्तीत जास्त खेळाडूंनी आपले अर्ज दिनांक १० जूनपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, श्री. छ. शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा येथे कय्युम शेख, मैदानी क्रीडा मार्गदर्शक यांच्याकडे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांनी केले आहे.





