Satara : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त

सातारा: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी (दि. 14) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (ए) वतीने सातारा शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती विजय ओव्हाळ व किरण ओव्हाळ यांनी दिली.
प्रतापसिंहनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात सकाळी 9.30 वाजता बुद्धवंदना होणार आहे. त्यानंतर डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून, फटाक्यांची आतषबाजी करण्यात येणार आहे.
प्रतापसिंहनगर येथील शाळेतील मुलांना शालेय साहित्य व खाऊवाटप करण्यात येणार आहे. सकाळी 11 वाजता प्रतापसिंहनगर ते शाहू चौकातील आंबेडकर पुतळा परिसर, अशी भव्य रॅली काढण्यात येणार आहे. शाहू चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून, 134 किलोचा केक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्य उपाध्यक्ष तथा सातारा जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांच्या हस्ते कापण्यात येणार आहे.
दुपारी 12.30 वाजता रिपब्लिकन महिला आघाडीच्या दामिनीताई निंबाळकर आणि युवक आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुरेश पवार यांच्या हस्ते ज्यूस आणि पाणी वाटप करण्यात येणार आहे. 2 वाजता मनीषा सोनवणे व मदन खंकाळ यांच्या हस्ते भोजनदान करण्यात येणार आहे.
जयंती उत्सवनिमित्त कार्यक्रमांचे नियोजन राजेंद्र पवार, सागर गव्हाळे, सागर मोहोळ, शनिदेव गालफाडे, प्रशांत सोनकांबळे, किशोर इंगळे, दीपक भोसले, रिपाइंच्या विविध सेलचे पदाधिकारी, महिला आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केले आहे.





