सातारा | हद्दपारीचा आदेशाचा भंग करणाऱ्या एकावर गुन्हा
Updated On:

नागठाणे – सातारा उपविभागीय दंडाधिकारी सातारा यांनी १२ डिसेंबर २०२३ रोजी प्रशांत उर्फ सोन्या शशिकांत जगताप (रा. अतित ता. सातारा) याच्या सातारा जिल्हा हद्दपारीचा आदेश पारित केला होता. मात्र, दि. २६ रोजी बोरगाव पोलीस ठाण्याच्या डी. बी. टीमचे अंमलदार प्रशांत चव्हाण, केतन जाधव हे हद्दीत गस्त घालत होते.
त्यावेळी अतित बसस्थानक परिसरात तडीपार प्रशांत जगताप हा मिळून आला. त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता कोणत्याही अधिकृत परवानगी शिवाय तो अतित येथे वास्तव्य करत असल्याचे निदर्शनास आले. त्यास पोलीस ठाण्यात आणून तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला. पो. ना. प्रशांत चव्हाण यांनी फिर्याद दिली. स. फौ. हिम्मत दबडे पाटील अधिक तपास करत आहेत.





