Satara News : धक्कादायक ! 10 दिवसांपूर्वी विवाह झालेल्या नवदाम्पत्यावर काळाचा घाला
कराड– चिपळूण मार्गावर येरफळे गावच्या हद्दीत गारवा हॉटेलसमोर सोमवारी दुपारी (Satara News) दोन वाजण्याच्या सुमारास ट्रकला ओलांडून पुढे जात असताना समोरून येणाऱ्या पिकअप गाडीची दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक झाल्याने अपघात झाला.

Satara News : कराड– चिपळूण मार्गावर येरफळे गावच्या हद्दीत गारवा हॉटेलसमोर सोमवारी दुपारी (Satara News) दोन वाजण्याच्या सुमारास ट्रकला ओलांडून पुढे जात असताना समोरून येणाऱ्या पिकअप गाडीची दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक झाल्याने अपघात झाला.
यामध्ये दुचाकीवर असणाऱ्या नवदाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. या दोघांचे (Satara News) लग्न दहा दिवसापूर्वी झाले होते. अचानक ही दुदैवी घटना घडल्याने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. या अपघाताची नोंद पाटण पोलिसात झाली आहे.
घटनास्थळावरून (Satara News) मिळालेली माहिती अशी की, पाटण तालुक्यातील सडादाढोली येथील राजू विठ्ठल झोरे (वय २५) व पत्नी राणी राजू झोरे (वय २३) हे दोघे सोमवारी दि. २० रोजी दुचाकीवरून शिराळा येथे नातेवाइकांच्या लग्नासाठी निघाले होते. दुपारी दोनच्या सुमारास हा भीषण अपघात झाला.
त्यामध्ये राजू झोरे यांचा जागीच मृत्यू झाला. तर पत्नी राणी हिला कराड येथे दवाखान्यात घेऊन जात असताना तिचादेखील मृत्यू झाला. याप्रकरणी पिकअप चालक सचिन यशवंत मोहिते (रा. बोंद्री, ता. पाटण) याच्यावर पाटण पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सपोनी अविनाश कवठेकर तपास करीत आहेत.






