Satara News: नेर धरणाचे दरवाजे आज उघडणार! रब्बी हंगामासाठी ना. जयकुमार गोरेंचा मोठा निर्णय

प्रभात वृत्तसेवा
सातारा : रब्बी हंगामातील पिकांसाठी शेतकर्यांच्या मागणीनुसार आज दि. 11 पासून नेर धरणातून कालव्याद्वारे आणि येरळा नदीपात्रातून पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी तसे निर्देश दिले होते. त्यासाठी कालवे साफसफाई आणि दुरुस्तीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. सद्यस्थितीत शक्य तितक्या लांबीच्या कालव्यातून पाणी वितरण केले जाणार आहे.
416 दशलक्ष घनफूट क्षमतेच्या ब्रिटिशकालीन नेर धरणातून मुख्य, डाव्या आणि उजव्या कालव्यांसह येरळा नदीपात्रातून शेतीसाठी पाणी सोडले जाते. गेल्या वर्षी चांगले पर्जन्यमान झाल्याने तसेच जिहे-कठापूर योजनेचे पाणी धरणात सोडल्याने धरण बराच कालावधी ओसंडून वहात होते. आताही धरणात 70 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्याची शेतकर्यांची मागणी लक्षात घेऊन ना. जयकुमार गोरे यांनी नेर धरण व्यवस्थापनाला पाणी सोडण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश दिले होते.रब्बी हंगामासाठी नेरमधून पाणी सोडण्याचे नियोजन पुढीलप्रमाणे करण्यात आले आहे. येरळा उजवा कालव्याद्वारे खटाव, धकटवाडी, सिद्धेश्वर कुरोलीसाठी 20 दिवस पाणी सोडण्यात येणार आहे.
येरळा डाव्या कालव्यातून खटाव, भुरकवडी, दरुज, सिद्धेश्वर कुरोलीसाठी 10 दिवस, तर नेर मुख्य कालव्यातून नेर, पुसेगाव, विसापुर, खातगुण, भांडेवाडीसाठी एकत्रित 20 दिवस पाणी देण्यात येणार आहे. येरळा नदी पात्रातून नेर, पुसेगाव, खातगुण, खटाव, भुरकवडी, सिद्धेश्वर कुरोली, वाकेश्वरला एकत्रित 20 दिवस पाणी सोड





