Satara News : शशिकांत शिंदे व अंकुश कदमांनी विधानसभा लढवावी; भाजपच्या वसंतराव मानकुमारे यांचे आव्हान
जावळी तालुक्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा चांगलेच (Satara News) तापले असून भाजपच्या जनआक्रोश मोर्चातून विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला.

Satara News : जावळी तालुक्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा चांगलेच (Satara News) तापले असून भाजपच्या जनआक्रोश मोर्चातून विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला. मेढा येथे आयोजित मोर्चात भाजपचे ज्येष्ठ नेते वसंतराव मानकुमारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि शिवसेना नेते अंकुश कदम यांना विधानसभा निवडणूक लढविण्याचे आव्हान दिले.
शशिकांत शिंदे आणि अंकुश कदम यांनी आमदारकीची (Satara News) निवडणूक लढवून दाखवावी. त्यांचे डिपॉझिट जप्त झाले नाही तर बघा, अशा आक्रमक शब्दांत मानकुमारे यांनी दोन्ही नेत्यांवर निशाणा साधला.
जावळी तालुक्यातील राजकीय संघर्ष आता केवळ आरोप- प्रत्यारोपांपुरता (Satara News) मर्यादित न राहता थेट निवडणुकीच्या मैदानातील आव्हानांपर्यंत पोहोचल्याचे या मोर्चातून स्पष्ट झाले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत जनआक्रोश मोर्चाला पाठिंबा दिला.






