Satara News : ‘कोयना दौलत’वर ज्येष्ठ नागरिक देणार धडक

सातारा : शहरातील ज्येष्ठ नागरिक संघांनी दि. १८ ऑगस्ट रोजी गोल बाग (राजवाडा) ते पालकमंत्री निवासस्थान रॅली काढण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांना अपायकारक ठरणाऱ्या डॉल्बीला विरोध हा या रॅलीचा संदेश असून यासंदर्भात पालकमंत्री शंभूराज देसाई यांना यावेळी निवेदन दिले जाणार आहे.
समर्थ परिसर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विजय देशपांडे यांनी याबाबतची माहिती दिली. शहरामध्ये गणरायाच्या आगमनापूवाच सातारा शहर पोलिसांनी एका मंडळाच्या डॉल्बीवर कारवाई करून डॉल्बीचा आग्रह धरणाऱ्यांना एक प्रकारची तंबीच दिली आहे.
मात्र, शहरातील विविध भागांतील सर्व ज्येष्ठ नागरिक संघांनी डॉल्बी यंत्रणेचे दुष्परिणाम आणि त्याला विधायक मागनि करावयाचा विरोध या दृष्टीने यापूर्वीच हालचाली सुरु केल्या आहेत. ज्येष्ठ नागरिक आक्रमक झाले असून ही चळवळ नेटाने पुढे चालू ठेवण्यासाठी कमानी हौद, पोलीस करमणूक केंद्र, नगरपालिका कार्यालय, रयत शिक्षण संस्था, सयाजीराव शाळा यामार्गे तेथून पालकमंत्री देसाई यांच्या ‘कोयना दौलत’ बंगल्यावर जाऊन निवेदन दिले जाणार आहे.
त्यांचे प्रयत्न आहेत. सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने समाजमन तयार करणे आणि गणराया सोहळा हा प्रबोधनात्मक आहे हा संदेश देण्याकरता ही रॅली गांधी मैदानावरुन काढण्यात येणार आहे. गोलबाग परिसरात सायंकाळी साडेचार वाजता ज्येष्ठ नागरिकांनी जमावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
ही रॅली गोल बाग, राजपथ, देवी चौक, डॉल्बीवर बंदी घालू शकत नाही असे पालकमंत्र्यांनी जाहीर केले असले तरी पॉलिसी मॅटर म्हणून जनतेच्या भावना त्यांच्या कानावर घालण्यात येणार आहेत.
रॅलीमध्ये ज्येष्ठ नागरिक संघ, इंडियन मेडिकल असोसिएशन, स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघटना, स्वातंत्र्यसंग्राम शिक्षण संस्था, क्रीडा असोसिएशन इत्यादी संघटना सहभागी होणार आहेत. या रॅलीची पूर्वसूचना पालकमंत्री व पोलीस प्रशासनाला दिली जाणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसह सर्व वयोगटातील व सर्व स्तरातील नागरिकांनी या रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहन विजय देशपांडे यांनी केले आहे.
डॉल्बी यंत्रणेसाठी अनाठायी हट्ट
डॉल्बीचे अपाय माहीत असूनही डॉल्बी यंत्रणेसाठी धरला जाणारा हट्ट हा अनाठायी आहे. काही वर्षांपूर्वी साताऱ्याने डॉल्बीचे घातक परिणाम पाहिले आहेत त्यामध्ये एक इमारत कोसळून तिघांचा मृत्यू झाल्याच्या वेदनादायक अनुभव सातारकरांनी घेतला आहे. गणेशोत्सव हा प्रबोधनाचा उत्सव आहे. सामाजिक बांधिलकीचा उत्सव आहे. त्यामुळे डॉल्बीच्या विरोधात अखंड चळवळ राबवणे हेच क्रमप्राप्त आहे.
– विजय देशपांडे, समर्थ परिसर ज्येष्ठ नागरिक संघ
अर्धा तास डॉल्बी यंत्रणेसोबत उभे राहून दाखवावे
श्री गणरायाचे आगमन साताऱ्यात निर्विघ्नपणे व्हावे ही सर्व सातारकरांची इच्छा आहे. थोर स्वातंत्र्य सेनानी व विचारवंत लोकमान्य टिळक यांचा गणेशोत्सव सुरू करण्यामागचा हेतू म्हणजे लोक चळवळ उभी करणे हा होता. या लोक चळवळीच्या प्रबोधनात्मक अशा जमेच्या बाजू होत्या. सध्याच्या गणेशोत्सवामध्ये प्रबोधन हरवून त्याचा इव्हेंट बनला आहे. राजकीय नेते सुद्धा डॉल्बीचा विषय फारसा गांभीर्याने घेत नाहीत. लोकप्रतिनिधींनी एक अर्धा तास डॉल्बी यंत्रणे सोबत उभे राहून दाखवावे, म्हणजे त्यांना त्या यंत्रणेचे अपाय आणि त्याचे गांभीर्य लक्षात येईल.
-प्रसाद चाफेकर, ज्ञानविकास मंडळ
डॉल्बी यंत्रणेला कायमचा निरोप दिला जावा
श्री गणरायाच्या आगमनासाठी सातारा नगरी उत्सुक असताना त्या प्रबोधनात्मक उत्सवांमध्ये डॉल्बीच्या नावाखाली आवाजाचा धांगडधिंगा हा मनाला न पटणारा आहे. त्यामुळे डॉल्बीला विरोध झालाच पाहिजे आणि त्यावर बंदी घालण्याचा धोरणात्मक निर्णय घेणे गरजेचे आहे. बऱ्याच वेळा विशिष्ट समुदायाच्या अर्थकारणासाठी संपूर्ण समाजाला भेटीला घरणे चुकीचे आहे. गणेशोत्सव हा समाजाच्या विचारांना दिशा देणारा आणि बुद्धीचा वारसा समृद्ध करणारा उत्सव आहे. कारण गणराया ही बुद्धीची देवता आहे. त्यामुळे पारंपारिक वाद्ये मर्यादित वाजवून डॉल्बी यंत्रणेला कायमचा निरोप दिला जावा, अशी सद्बुद्धी गणरायाने सर्व राज्यकर्त्यांना देवो.
– सुमती देशपांडे ज्येष्ठ





