Satara News : सातारा पोलिसांची धडक कारवाई ! CEIR पोर्टलद्वारे १.५ कोटींचे ४४९ चोरीला गेलेले मोबाईल हस्तगत; नागरिकांना केले परत
विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या सातारा जिल्हा पोलीस (Satara News) दलाच्या वार्षिक निरीक्षण तपासणीदरम्यान हा वितरण सोहळा पार पडला.

Satara News : सातारा जिल्हा पोलीस दल आणि सायबर पोलीस ठाण्याच्या विशेष मोहिमेअंतर्गत भारत सरकारच्या CEIR (Central Equipment Identity Register) पोर्टलचा प्रभावी वापर करून सुमारे १.५ कोटी रुपये किमतीचे (Satara News) ४४९ हरवलेले व चोरीस गेलेले मोबाईल फोन शोधून मूळ मालकांना परत करण्यात आले आहेत. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या हस्ते या मोबाईलचे वितरण तक्रारदारांना करण्यात आले.
विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या सातारा जिल्हा पोलीस (Satara News) दलाच्या वार्षिक निरीक्षण तपासणीदरम्यान हा वितरण सोहळा पार पडला. सन २०२४ ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत जिल्ह्यात हरवलेल्या व चोरीस गेलेल्या मोबाईलबाबत एकूण १४,३०० तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.
विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल तक्रारींमधील IMEI क्रमांकाच्या आधारे तांत्रिक तपास करून सातारा पोलिसांनी आतापर्यंत एकूण ४,८४२ मोबाईल हस्तगत करत नागरिकांना सुपूर्द केले आहेत. याच मोहिमेचा भाग म्हणून गुरुवारी आयोजित कार्यक्रमात १ कोटी ५० लाख रुपये किमतीचे ४४९ मोबाईल हँडसेट सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून नागरिकांना परत करण्यात आले.
या प्रसंगी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्यासह सायबर पोलीस ठाण्याचे व विविध पोलीस ठाण्यांचे अधिकारी व अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तांत्रिक तपासातून मोबाईल गैरवापरावर बंदी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाणे व जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या पथकांनी (Satara News) ही मोहीम यशस्वीरीत्या पार पाडली. CEIR पोर्टलच्या प्रभावी वापरामुळे नागरिकांचा किमती ऐवज तर परत मिळालाच, शिवाय चोरीच्या मोबाईलचा संभाव्य गैरवापर रोखण्यासही मोठी मदत झाली आहे.
या उत्कृष्ट कामगिरीबद्दल स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उत्तम भापकर, सहायक पोलीस निरीक्षक राजेश माळी तसेच पोलीस अंमलदार प्रशांत मोरे, ओंकार डुबळ, संदीप पाटील, राकेश घाडगे, रामदास भास्करवाड, स्वप्नील शिंदे, किरण जगताप आणि प्रवीण फडतरे यांचे विशेष पोलीस महानिरीक्षकांनी विशेष कौतुक व अभिनंदन केले.






