Satara News : ‘कटगुणच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव कटिबद्ध’; महेश शिंदेनी दिले आश्वासन
स्त्री-शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतिराव फुले यांची कुलभूमी असलेले कटगुण हे गाव विकासाच्या दृष्टीने परिपूर्ण बनवण्यासाठी आपण मागील अनेक वर्षांपासून (Satara News) प्रयत्नशील आहोत.

Satara News : स्त्री-शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतिराव फुले यांची कुलभूमी असलेले कटगुण हे गाव विकासाच्या दृष्टीने परिपूर्ण बनवण्यासाठी आपण मागील अनेक वर्षांपासून (Satara News) प्रयत्नशील आहोत.
सध्या ७० टक्के परिसर ओलिताखाली आणण्यात यश मिळाले असून, येत्या काळात शंभर टक्के जमीन ओलिताखाली आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची भावना कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार महेश शिंदे यांनी (Satara News) व्यक्त केली.
सातारा जिल्हा परिषद व खटाव पंचायत समितीच्या उत्तम नियोजनामध्ये संपन्न झालेल्या महात्मा ज्योतिराव फुले यांच्या १३६ व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त कटगुण, ता. खटाव येथे आयोजित कार्यक्रमात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते.
यावेळी आमदार शिंदे म्हणाले, “शक्तीला भक्तीची जोड असेल, तर इतिहास घडतो. महात्मा फुलेंच्या समतेच्या विचारावर आपण सर्वजण मार्गक्रमण करत आहोत. या भूमीच्या विकासासाठी ज्या ज्या संकल्पना पुढे येतील, त्यांचा सकारात्मक आणि अभ्यासपूर्ण विचार करून त्या प्रत्येकासाठी आपण नेहमीच आग्रही राहिलो आहोत आणि भविष्यातही राहणार आहोत.” यावेळी जिल्हास्तर व तालुकास्तरावरील विविध स्पर्धांमध्ये यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांचे त्यांनी विशेष कौतुक केले.
२८ नोव्हेंबर हा महात्मा फुलेंचा पुण्यतिथी दिन सातारा जिल्हा परिषद आणि खटाव पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुलेंची कुलभूमी असलेल्या कटगुण या गावी दरवर्षी मोठ्या श्रद्धाभावनेने साजरा केला जातो.
स्मारक परिसर विकासासाठी २० लाख रुपयांचा निधी – डॉ. प्रिया शिंदे
कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी असलेल्या जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे यांनी महात्मा फुले यांना आदरांजली वाहून मनोगत व्यक्त केले. यावेळी त्यांनी स्मारक परिसराच्या विकासासाठी विशेष तरतूद म्हणून २० लाख रुपयांचा निधी जाहीर केला. तसेच महात्मा फुले यांच्या जीवनातील विविध पैलू त्यांनी उलगडून दाखवले. आदर्श व्यापक ग्रंथालयाची संकल्पनाही त्यांनी यावेळी मांडली.
या कार्यक्रमासाठी कोरेगाव-खटाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश शिंदे, सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, प्रांताधिकारी उज्वला गाडेकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले, खटाव पंचायत समितीच्या सभापती वनिता दुबळे, उपसभापती रेश्मा शेडगे, श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त रणधीर शेठ जाधव, माध्यमिक शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, प्राथमिक शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी, खटावच्या तहसीलदार बाई माने, पंचायत समिती सदस्य शशिकांत रोमन, हनुमंत बोटे, महेश वाघ, मनोज देशमुख, प्रगती कोकाटे, संग्राम कदम, शुभम शिंदे उपस्थित होते.
तसेच प्रसाद जुगदर, गटविकास अधिकारी योगेश कदम, उपशिक्षणाधिकारी हणमंत यादव, गटशिक्षणाधिकारी संगीता गायकवाड, शिक्षण विस्तार अधिकारी संभाजी कानवटे,शिक्षण विस्तार अधिकारी सोनाली विभूते, सहाय्यक गटविकास अधिकारी जयवंत दळवी, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी वर्षा ओमासे, वनिता कारंडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. युनिस शेख, कटगुण ग्रामपंचायत प्रशासक माधव तमनबोईनवाड, ग्रामपंचायत अधिकारी रूपाली कोळेकर, खटाव पंचायत समितीचे सर्व केंद्रप्रमुख, तालुक्यातील विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी, सर्व अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, महात्मा फुले ट्रस्टचे विविध पदाधिकारी, कटगुण गावची विविध तरुण मंडळे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्याचा आढावा आपल्या भाषणातून घेतला. उपसभापती रेश्मा शेडगे यांनी महात्मा फुलेंच्या स्त्री-शिक्षणाच्या कार्यावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमादरम्यान उत्कृष्ट वक्ते आणि अभ्यासू लेखक डॉ. नवनाथ लोखंडे यांचे महात्मा फुले यांच्या जीवनपटावर आधारित अत्यंत प्रभावी व्याख्यान झाले. महात्मा फुलेंचे वास्तववादी विचार, शैक्षणिक तळमळ आणि समाज सुधारण्यासाठी त्यांनी घेतलेल्या प्रयत्नांचे विविध उदाहरणांद्वारे त्यांनी अतिशय सुंदर विवेचन केले.
पंचायत समिती, खटाव व एकात्मिक बाल विकास प्रकल्प यांच्या सर्व अधिकारी, अंगणवाडी सेविका, उमेद बचत गटाच्या सदस्य यांच्यामार्फत एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या विविध उपक्रमांचे प्रदर्शन व पाककृती स्पर्धा भव्य हॉलमध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या. हे प्रदर्शन व स्पर्धा सर्वांच्या आकर्षणाचा महत्त्वाचा केंद्रबिंदू ठरला.
विद्यार्थ्यांचा गुणगौरव
महात्मा ज्योतिराव फुले यांच्या १३६ व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त सातारा जिल्हा परिषद व पंचायत समिती, खटाव यांच्यामार्फत जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय वक्तृत्व, निबंध, पोवाडा, गायन व चित्रकला अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये यशस्वी ठरलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा कार्यक्रमादरम्यान सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन गौरव (Satara News) करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महात्मा फुले ट्रस्टचे सचिव सुधीर गोरे यांनी केले, तर सूत्रसंचालन अजित चव्हाण यांनी केले. उपस्थितांचे आभार गटशिक्षणाधिकारी संगीता गायकवाड यांनी मानले.






