Satara News : स्वच्छ सर्वेक्षणात दहिवडी नगरपंचातीचा डंका; राज्यात नववा क्रमांक

दहिवडी : स्वच्छ सर्वेक्षण – २०२४ अंतर्गत दहिवडी नगरपंचातीने पुन्हा एकदा उत्तम कामगिरी केली आहे. राज्यात नववा क्रमांक मिळवत Satara News : आपल्या कामगिरीचा डंका वाजवला असून कामगिरीत सातत्य राखले आहे.
केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण – २०२४ अंतर्गत दहिवडी नगरपंचायतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आपला सहभाग नोंदवला होता. स्वच्छ सर्वेक्षण – २०२४ अंतर्गत दहिवडी शहराचा २० हजार पेक्षा कमी लोकसंख्या गटात समावेश आहे. या गटात दहिवडीला देशात २०३५ शहरांमध्ये ८५ वा क्रमांक व राज्यातील १६३ शहरांमध्ये ९ वा क्रमांक प्राप्त झाला आहे.
तसेच दहिवडी शहराला ODF++ व १ स्टार कचरा मुक्त शहर(GFC) मानांकन प्राप्त झाले आहे. या कामगिरीबद्दल दहिवडी शहरातील सर्व नागरिकांचे, सर्व पत्रकार बांधवांचे, सर्व सभापतींचे, सर्व सदस्यांचे, मुख्याधिकारी व त्यांचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे नगराध्यक्षा निलम अतुल जाधव यांनी अभिनंदन केले आहे व यापुढेही कामगिरी मध्ये सातत्य राखण्यासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.





