Satara News : मांढरदेव येथे चिमुकल्यांचा दिंडी सोहळा उत्साहात पार पडला

मांढरदेव : आषाढी एकादशीच्या निमित्ताने आज मांढरदेव येथील प्राथमिक शाळेच्या तसेच अंगणवाडीच्यावतीने चिमुकल्यांच्या पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. दिंडीमध्ये पारंपरिक वेशभूषा करून विद्यार्थी, विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. काही विद्यार्थी हातामध्ये पताका घेऊन तर काही विद्यार्थिनींनी छोटेशे तुळशी वृंदावन घेऊन, तर काही विद्यार्थी हातामध्ये टाळ घेऊन सहभागी झाले होते.
या दिंडी सोहळ्यामध्ये ग्रामस्थ, पालक महिलांसह युवकांनी सहभाग दाखविला होता. अतिशय भक्तिमय वातावरणात टाळ मृदुंगाच्या गजरात अभंगाचे गायन करत गावातून या दिंडी सोहळ्याची फेरी काढण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक उमेश गायकवाड, उपशिक्षक शिवाजी गाढवे आणि शिक्षिका मनीषा सपाटे यांचबरोबर शाळा शिक्षण समिती अध्यक्ष परशुराम मांढरे, प्राथमिक शाळेचे शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच शाळा शिक्षण समितीचे अध्यक्ष परशुराम मांढरे उपस्थित होते.
तसेच युवा कार्यकर्ते गणेश बोबडे, दीपक. य. मांढरे, भरत जाधव, विकी वानखेडे, शंकर मांढरे, शुभम काशीद, पूजा मांढरे, कांचन मांढरे, दीपाली मांढरे, सोनम मांढरे, प्रीती मांढरे, अश्विनी काशिद, ऋतुजा मांढरे, कोमल मांढरे, जयश्री मांढरे, पोलीस पाटील जयश्री मांढरे, योगिता मांढरे, रोहित गायकवाड, ज्येष्ठ ग्रामस्थ पोपट मांढरे आणि पालक हजर होते. दिंडी सोहळ्यातील विद्यार्थ्यांना तसेच ग्रामस्थांना भारत जाधव यांच्याकडून प्रसाद वाटप करण्यात आले.





