Satara News : कण्हेर धरणाच्या डावा तीर कालव्याला वासोळे गावच्या (ता. सातारा) हद्दीत साखळी क्रमांक १५/४०५ येथील नलिका मोरीजवळ भगदाड पडले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून वाया गेले आहे. उरमोडी धरणातून ४७५ क्युसेक व कण्हेर धरणातून २७५ क्युसेक असा एकूण कालव्यामध्ये मुखाशी ७५० क्युसेकने विसर्ग सुरू होता. अंदाजे ५५० क्युसेक विसर्ग फुटलेल्या कालव्यामधून ओढ्यास सुरू आहे. तसेच दोन्ही धरणांतून विसर्ग तत्काळ बंद करण्यात आले असून कालव्यावरील अतिवाहक द्वार Escape (कण्हेर डावा कालवा, सा क्र १/०८६) देखील उघण्यात आले आहेत/ कालव्यातील पाणी लवकर निचरा होण्याकरिता आकले गावातील कालव्यावरील अतिवाहकातून वेण्णानदीत सोडण्यात आले आहे. अंदाजे २०० ते ३०० क्यूसेक पाणी नदीपात्रात सकाळी ८ ते १० पर्यंत सुरू राहील.