सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा २६ वा वर्धापन दिन सोहळा कार्यक्रम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी (दि.१०) सकाळी १० वाजता पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात साजरा करण्यात येणार आहे. सातारा जिल्ह्यातील पक्षाचे जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष, शहराध्यक्ष, सर्व फ्रंटल व सेलचे जिल्हा व तालुका स्तरावरील पदाधिकारी, निमंत्रित व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहवे, असे आवाहन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र प्रभारी आ. शशिकांत शिंदे, माजी आमदार बाळासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील यांनी केले आहे.