Satara : लोकमान्यतर्फे आज वाईत मोफत नेत्र तपासणी शिबिर
Updated On:

पुणे : लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वाई शाखेच्या 11 व्या वर्धापनदिनानिमित्त उद्या, दि. 7 रोजी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
वाई शाखेचा वर्धापनदिन शुक्रवारी (दि. 9) साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. लोकमान्य सोसायटी व गॅलेक्सी आय हॉस्पिटल यांच्यावतीने बुधवारी (दि. 7) सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत वाई शाखा कार्यालयात शिबिर होणार आहे.
ग्राहक, सभासदांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे विभागीय प्रमुख सुशील जाधव यांनी केले आहे.





