Satara : महिलादिनानिमित्त आज फलटणमध्ये लावणी महोत्सव

फलटण : फलटण शहर भाजप आणि माऊली फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने माऊली फाउंडेशन वर्धापन दिन, जागतिक महिला दिनानिमित्त शनिवार, दि. ८ मार्च रोजी लावणी महोत्सव, अहिल्यादेवी होळकर पुरस्काराचे वितरण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
बारस्कर गल्ली येथील अवस्थान मंदिरासमोर अहिंसा मैदानावर सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमांचे उदघाटन जिल्हापरिषदेच्या मा. सदस्या अॕङ . जिजामाला नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात येणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून सौ. मनिषा समशेरसिंह नाईक निंबाळकर यांची उपस्थिती आहे.
यावेळी घनिष्टा काटकर यांची लावणी होणार असून यावेळी राणी अहिल्यादेवी होळकर पुरस्कार साहित्यीक आणि मल्हार युग पुस्तकाच्या लेखिका डॉ. सौ. आम्रपाली कोकरे ज्योत्तेनवार यांना प्रदान करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात लटण शहरातील महिला धर्मगुरुचे पुजन आणि महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थिती महिलांना स्कूटर , सोन्याची नथ , चांदीचा करंङा , पैठणी अशी २२५ बक्षिसे लकी ङ्राॕ पद्धतीने वाटण्यात येणार आहेत. महिलांनी उपस्थित राहावे असे आवाहन माऊली फाउंडेशनच्यावतीने करण्यात आले आहे.





