Satara : खा. शरद पवार आज साताऱ्यात
Updated On:

सातारा : राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार शनिवारी (दि.१२) साताऱ्यात येत असून त्यांच्या उपस्थितीत रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलची मिटींग होणार आहे.
खा. शरद पवार शनिवारी सकाळी ९.४५ वाजता हेलिकॉप्टरने सैनिक स्कूल मैदानावर येणार आहे. १० वाजता यशवंतराव चव्हाण महाविद्यालयास ते भेट देणार आहेत. ११ ते १ या वेळेत छत्रपती शिवाजी कॉलेज येथे रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल मिटींगला खा. पवार उपस्थित राहणार आहेत.
दुपारी १ ते २ या वेळेत खा. पवार शासकीय विश्रामगृहावर थांबणार आहेत. त्यानंतर सैनिक स्कूल मैदानावरुन ते हेलिकॉप्टरने सोलापूरला जाणार आहेत.





