Satara : संजीवराजे यांच्या बंगल्यावर ‘आयकर’ची चौकशी सुरूच

फलटण : राजे गटाचे नेते संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या बंगल्यावर ३६ तास उलटल्यानंतरही आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरूच आहे. विधान परिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू आणि सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या बंगल्यावर आयकर विभागाने बुधवारी पहाटे ६ वाजता छापा टाकला होती.
आयकर विभागाकडून कालपासून चौकशी सुरू करण्यात आली असून या छाप्याला आज ३६ तास उलटल्यानंतरही अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरूच आहे. संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या ‘सरोज व्हिला’ या बंगल्यावर काल पहाटे आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला. तपास यंत्रणेकडून कालपासून संजीवराजे यांच्याशी संबंधित कंपन्या आणि इतर बाबींची माहिती घेतली जात आहे. आजही आयकर विभागाचे अधिकारी याबाबत चौकशी करत आहेत.
याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. गोविंद मिल्क या दूध प्रकल्पाच्या अनुषंगानेही चौकशी केली जात
असल्याचे सांगण्यात येत आहे.





