Satara : साताऱ्यात चढ्या दरामुळे सातारकरांना द्राक्षे आंबट

सातारा : साताऱ्यात यंदा दाक्षांची आवक दिसत असली प्रत्यक्षात यंदा लांबलेल्या पावसाचा फटका या फळ बाजाराला बसला आहे. साताऱ्याच्या मार्केट यार्डा मध्ये केवळ साडेचारशे ते पाचशे क्रेटची आवक होत असल्याने चढ्या दरामुळे सातारकरांना द्राक्षे आंबट झाली आहेत. सांगलीची पांढरी व बारामतीची काळी द्राक्षे सुद्धा ऐन गुढी पाडव्याच्या मुहुर्तावर चांगलीच भाव खात आहेत. त्यामुळे सातारकरांच्या खिशाला चाट बसत आहे.
यंदा पश्चिम महाराष्ट्रात लांबलेल्या पावसाचा मोठा फटका द्राक्षाच्या पिकाला बसला आहे. त्याचाच परिणाम म्हणून मागील वर्षीच्या तुलनेत महिनाभर उशिराने हंगाम सुरू झाला आहे. उत्पादनातही ३० ते ४० टक्क्यांनी घट होणार असल्याचा अंदाज आहे. मार्केटयार्डातील फळ बाजारात मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली आहे. ही आवक येत्या एप्रिलपर्यंत सुरू राहणार असल्याचा अंदाज व्यापारी सतीश जगताप यांनी व्यक्त केला.
सद्य:स्थितीत फळबाजारात रोज ४०० ते ५०० क्रेट द्राक्षांची आवक होत आहे. एका क्रेटमध्ये नऊ किलो द्राक्षे असतात. काळी (जम्बो) द्राक्षांची बारामती आणि सातारा जिल्ह्यातील फलटण भागातून आवक होत आहे. तर सांगली जिल्ह्यातून पांढर्या द्राक्षांची (तास-ए-गणेशची) आवक होत आहे. काही दिवसांपासून बाजारात हंगामपूर्व द्राक्षांची आवक होत होती. मात्र, ही हंगामतील द्राक्षे आहेत. लांबलेल्या पाऊसामुळे नुकसान झाल्याने यंदा नेहमीच्या तुलनेत ५५ ते ६० टक्केच उत्पादन झाल्याचे द्राक्ष उत्पादकांची माहिती आहे . येत्या कालावधीत द्राक्षांची आवक वाढणार आहे. आवक वाढली तरीही भाव टिकून राहतील, असा अंदाजही व्यापाऱ्यांनी यांनी व्यक्त केला.
बाजारात दाखल होणार्या द्राक्षांना मोठा उठाव आहे. त्यामुळे दरही अधिक आहेत. नववर्ष स्वागतासाठी पर्यटकांनी पर्यटन स्थळी मोठी गर्दी केली आहे. त्यामुळे गोवा, लोणावळा, माथेरान, महाबळेश्वर, वाई, पाचगणीसह विविध पर्यटन स्थळाहून द्राक्षांना मागणी आहे. याबरोबरच स्थानिक बाजारपेठांसह गुजरात, बेंगलुरू, कोलकाता येथून द्राक्षांना मोठी मागणी आहे. त्यामुळे आवकेत वाढ होईपर्यंत हेच दर टिकून राहणार असल्याचा अंदाजही यांनी व्यक्त होत आहे .
घाऊक बाजारातील दर
द्राक्ष किलो दर
जम्बो (काळी द्राक्षे) ९ किलो ६०० ते १२००
तास-ए-गणेश (पांढरी द्राक्षे) ९ किलो ५०० ते ११००
किरकोळ दर
पांढरी द्राक्षे – ६० ते १०० रू किलो
काळी द्राक्षे – ९० ते १५० रू किलो





