Satara : महाबळेश्वर पर्यटन महोत्सवास राज्यपाल राहणार उपस्थित

कोयनानगर : महाबळेश्वर येथे दि. 2 ते 4 मे या कालावधीत होणार्या पर्यटन महोत्सवास राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे दि. 3 मे रोजी उपस्थित राहणार आहेत. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी राज्यपालांची राजभवनात भेट घेऊन, त्यांना महोत्सवाचे निमंत्रण दिले. हा महोत्सव महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीने होणार आहे.
या महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दि. 2 मे रोजी होणार असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. महाबळेश्वर पर्यटन महोत्सव राज्याच्या पर्यटन क्षेत्रासाठी नवा मैलाचा दगड ठरणार आहे. या महोत्सवास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यपालांचे गौरवोद्गार
दरम्यान, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी ‘दौलत : दौलतराव श्रीपतराव देसाई’ हा चरित्रग्रंथ राज्यपालांना भेट दिला. लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे कार्य आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार राज्यपालांनी यावेळी काढले.





