Satara : भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या प्रशिक्षणासाठी मोफत सुवर्णसंधी

सातारा : भारतीय सैन्यदल, नौदल,व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (एसएसबी) या परीक्षेची पुर्वतयारी करुन घेण्यासाठी छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक रोड नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतींसाठी ५ ते १४ मे २०२५ या कालावधीत एसएसबी कोर्स क्रं.६१ आयोजन करण्यात येत आहे.या कालावधीत प्रशिक्षणार्थीना नि:शुल्क प्रशिक्षण, निवास व भोजन दिले जाते.
सातारा जिल्हयातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी होण्याची सुवर्णसंधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात दि. २३ एप्रिल रोजी मुलाखातीस हजर राहावे. मुलाखतीस येताना त्यांनी डिपार्टमेंट ऑफ सैनिक वेलफेयर पुणे डीएसडब्ल्यु यांच्या साईडवर सर्च करुन त्यामधील एसएसबी-६१ कोर्ससाठी किंवा जिल्हा सैनिक कार्यालयाने प्रिंट दिलेले प्रवेशपत्र व सोबत असलेली परिशिष्ठांची प्रिंट घेऊन व ते पूर्ण भरुन सोबत घेऊन यावे.एसएसवी वर्गामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी खाली नमुद कोणतीही एक पात्रता असणे आवश्यक आहे व त्या संबधीचे प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्गाला येताना सोबत घेऊन यावे.
कंबाईड डिफेंस सर्व्हिसेस एक्झामिनेशन अथावा नॅशनल डिफेंन्स अकॅडमी एक्झामिनेशन पास झालेली असावी. त्यासाठी सर्व्ह्रिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. एनसीसी सर्टिफिकेट ए किवा बी ग्रेड मध्ये पास झालेले असावे व एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एस.एस.बी.साठी शिफारस केलेले असावे. टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एस.एस.बी मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे.
अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी,छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्रं ,नाशिक रोड, नाशिक यांचा ईमेल आयडी: trainingpctcnashik@gmailcom व दूरध्वनी ०२५३-२४५१०३२ किंवा व्हाट्सअप् क्रमांक ९१५६०७३३०६ वर कार्यालयीन वेळेत सपंर्क साधावा, असे आवाहन सातारा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल हंगे यांनी केले आहे.





