Satara : केंद्रीय रस्ते निधीमधून प्रथमच सातारा जिल्ह्याला २१८ कोटींचा निधी

सातारा : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी ऐतिहासिक कामगिरी करत सातारा जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच केंद्रीय रस्ते निधी मधून जिल्ह्याला तब्बल २१८ कोटी रुपयांचा भरीव निधी मिळवला आहे. पहिल्यांदाच मंत्री झालेल्या ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून जिल्ह्यातील सर्वच आमदार आणि खासदारांच्या कामांचा समावेश करून सर्व मतदारसंघांना न्याय देत केंद्रीय रस्ते निधीमधून भरीव निधी उपलब्ध करून देत अनोखा इतिहास घडवला आहे.
केंद्रीय रस्ते निधीमधून आजवर कधीही जिल्ह्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी मिळाला नाही पण, ना. शिवेंद्रसिंहराजेंनी मात्र मंत्रिपद मिळल्यानंतर नुकत्याच झालेल्या अधिवेशन काळात योग्य नियोजन करून अल्पावधीतच तब्बल २१८ कोटी रुपये निधी मिळवून आपल्या कार्यक्षमतेची चुणूक दाखवून दिली आहे. निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ना. शिवेंद्रसिंहराजेंनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री ना. फडणवीस यांचे आभार मानले आहेत.
मंजूर निधीतून सातारा- कोरेगाव- पंढरपूर-मोहोळ रस्ता रा.मा. १४१ भाग पोवई नाका ते बॉम्बे रेस्टॉरंट चौक या रस्त्याचे रुंदीकरण, सुधारणा व सुशोभीकरण करण्यासाठी ५० कोटी, खंडाळा- पळशी- कोरेगाव- रहिमतपूर- मसूर- कराड- पलूस रा. मा. १४२ भाग टकले ते कोरेगाव तालुका हद्द मधील रस्त्याचे रुंदीकरण व सुधारणा करण्यासाठी १३ कोटी, फलटण- शिंगणापूर- म्हसवड- शेनवडी रस्ता प्रजिमा १३ भाग शिंगणापूर ते वर. म्हसवड रस्त्याचे रुंदीकरण, मजबुतीकरण करणे ता. माण यासाठी ६ कोटी, पुसेगाव- वडूज-कातरखटाव- रा.मा. १४६ भाग वडूज ते कातरखटाव रस्त्याची लहान पुलासह सुधारणा करणे ता. खटाव यासाठी ९ कोटी तर, प्रजिमा १० ते धारपुडी- खटाव-जाखणगाव ते रा.मा. १४७ भाग डंगारेवस्ती ते अंबाबाई टेक मार्गे जाखणगाव ता. खटाव रस्त्याची रुंदीकरणासह सुधारणा करणेसाठी १५ कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे.
रा.मा. १४० ते आंबेघर फाटा पुनवडी- केडंबे- बोंडारवाडी रस्ता प्रजिमा १५३ भाग आंबेघर फाटा ते पुनवडी ता. जावली या रस्त्याची रुंदीकरणासह सुधारणा करणे १० कोटी, महाबळेश्वर- सातारा- रहिमतपूर- विटा रा.मा. १४० रामजीबुवा पूल या लहान पुलाचे पोहोचमार्गासह बांधकाम करणे ता. जावली यासाठी ८ कोटी, वाहिटे- केडंबे रस्ता ग्रा.मा. ७ मधील मोठ्या पुलाचे पोहोचमार्गासह बांधकाम करणे ता. जावली यासाठी ६ कोटी, रा.मा. १४० ते पुनवडी ग्रा.मा. २६ मध्ये रस्त्याची सुधारणा व संरक्षक भिंत बांधणे ता. जावली यासाठी ५ कोटी, पाचगणी- कुडाळ प्रजिमा २५ भाग आखाडे ते कुडाळ ता. जावली या रस्त्याचे रुंदीकरण व सुधारणा करणे १० कोटी, जोर वाई पाचवड प्रजिमा १९ येथे कुडाळी नदीवरील मोठ्या पुलाचे रुंदीकरण करणे यासाठी ११ कोटी,
कोयना नदीवरील जुना ब्रिटिश कालीन पूल, गुहागर- चिपळूण कराड, जत, बिजापूर रा.मा. १३६ ता. कराड येथे मोठ्या पुलाचे बांधकाम करणे ५० कोटी, भुईंज, शिवथर, पाडळी जळगाव प्रजिमा २२ भाग किकली फाटा ते राऊतवाडी ता. वाई या रस्त्याची सुधारणा करणे ५ कोटी, वाई जांभळी वाशिवली वासोळे आकोशी वायगाव बलकवडी फाटा उळुभ जोर धनगरवाडी कातरवस्ती प्रजिमा २४ भाग धोम ते जांभळी ता. वाई रस्त्याची रुंदीकरणासह सुधारणा करणे १० कोटी आणि वाई जांभळी वाशिवली वासोळे आकोशी वायगाव बलकवडी फाटा उळुभ जोर धनगरवाडी कातरवस्ती प्रजिमा २४ भाग वायगाव बलकवडी फाटा ते धनगरवाडी कातरवस्ती ता. वाई या रस्त्याची रुंदीकरणासह सुधारणा करण्यासाठी १० कोटी रुपये निधी उपलब्ध झाला आहे.
केंद्रीय रस्ते निधीमधून पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध झाल्याने जिल्हावासियांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. दरम्यान, मंजूर कामांची निविदा प्रक्रिया व इतर शासकीय सोपस्कार तातडीने पूर्ण करून कामे त्वरीत सुरु करा. कामे दर्जेदार करून वेळेत पूर्ण करा अशा सूचना ना. शिवेंद्रसिंहराजेंनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत.





