Satara : माजी सैनिकांनी ऑनलाईन; रजिस्ट्रेशन करण्याचे आवाहन
Updated On:

सातारा : सैनिक कल्याण विभागामार्फत देय सर्व आर्थिक मदती महाडीबीटी (MHDBT) प्रणालीद्वारे सुरू होणार आहेत. याकरिता सर्वांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे.
तरी सातारा जिल्हयातील सर्व माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी यांना आपले ऑनलाईन रजिस्ट्रेशन शनिवार, दि. ३१ मे २०२५ पूर्वी करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सतेश हंगे यांनी केले आहे.





