सातारा – हनुमानवाडी येथे नदीपात्रात आढळला मृतदेह
Updated On:

उंब्रज – हनुमानवाडी, ता. कराड गावच्या हद्दीत कृष्णा नदीपात्रात पोपट मारुती शितोळे (वय 35, रा. खिंडवाडी, ता. सातारा) यांचा मृतदेह गुरुवारी सकाळी 9 च्या सुमारास सापडला. दुपारनंतर या मृतदेहाची ओळख पटवण्यात पोलिसांंना यश आले.
मात्र, हा मृतदेह हनुमानवाडीच्या हद्दीत कसा आला, याचा तपास सुरू आहे. हनुमानवाडीच्या हद्दीत कृष्णा नदीपात्रात एका पुरुषाचा मृतदेह तरंगत असल्याचे काही ग्रामस्थांना दिसले. पोलीस पाटील किरण हत्ते यांनी याबाबत उंब्रज पोलीस ठाण्यात माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह पाण्याबाहेर काढून पंचनामा केला.





