Satara Crime | मोबाईलवरील एका लिंकनं उडवले ८ लाख ; वरिष्ठ शिक्षणाधिकाऱ्यांची फसवणूक

प्रभात वृत्तसेवा
सातारा – जावळी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी संजय श्रीरंग धुमाळ (रा. गोडोली) यांना मोबाईलवर अज्ञाताने लिंक पाठवून तब्बल आठ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. माहिती भरण्याच्या बहाण्याने पाठवलेल्या लिंकच्या माध्यमातून ८ लाख १० हजार २६६ रुपये काढण्यात आले. धुमाळ यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन याबाबत तक्रार दिली आहे.सातार शहरात ऑनलाइन लिंक पाठवून फसवाफसवीचे प्रमाण वाढलेले असून सायबर पोलिसांना अज्ञात चोरटे आव्हान ठरत आहेत. असाच काहीसा प्रकार जावलीळी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ यांच्या बाबतीत घडला आहे. संजय धुमाळ यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार दि. ७ ते 13 मे या दरम्यान ही फसवणूक घडल्याची म्हटले आहे.
मोबाईलवर त्यांना अज्ञाताने माहिती पाठवण्याच्या बहाण्याने एक लिंक पाठवली ती लिंक त्यांनी ओपन करून त्यामधील माहिती भरली. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यावरून टप्प्याटप्प्याने पैसे काढले जाऊ लागले ८ लाख १० हजार २६६ रुपये अज्ञात आणि काढून घेतले.फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर संजय धुमाळ यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. सातारा शहर पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून पोलीस उपनिरीक्षक अनिल जायपात्रे हे तपास करत आहेत. पोलिसांनी या प्रकरणांमध्ये चार आरोपी निष्पन्न केले आहेत, हे संशयित इतर राज्यातील असून यामधील सुमारे दीड लाख रुपये रक्कम होल्डवर ठेवण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.




