वाई : चंदुकाका सराफ ज्वेल्स्च्या या सुवर्णदालनामुळे वाईच्या विकासाला गती मिळणार आहे, असा विश्वास राज्यसभा खासदार व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन खासदार नितीनकाका पाटील यांनी व्यक्त केला.
दक्षिण काशी म्हणून परिचित असलेल्या कृष्णामाईच्या पाण्याने सुजलाम- सुफलाम झालेल्या व महागणपतींच्या आशीर्वादाने पावन झालेल्या वाई शहरात गेली 198 वर्षे शुध्दता, परंपरा आणि विश्वास या त्रिसुत्रीच्या भक्कम पायावर उभ्या राहिलेल्या व निरंतर प्रगती करत असलेल्या चंदुकाका सराफ ज्वेल्स यांच्या सुवर्णदालनाचे उद्घाटन बुधवारी दि. 23 एप्रिल रोजी राज्यसभा खासदार व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन खासदार नितीनकाका पाटील यांच्या हस्ते व चंदुकाका सराफ ज्वेल्सचे संचालक अतुल जिनदत्त शहा, सौ. संगीता अतुल शहा, सिध्दार्थ अतुल शहा, आदित्य अतुल शहा, साहस बागी, अभिनेत्री अश्विनी महांगडे, श्रुती जमदाडे, वाईचे माजी नगराध्यक्ष अनिल सावंत, जयदीप खामकर व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत येथील किसन वीर चौकात मोठया थाटात संपन्न झाले. वाईकरांच्या सेवेत रूजू झालेले चंदुकाका सराफ ज्वेल्स्चे हे १७ वे दालन आहे. यानिमित्त चंदुकाका सराफ ज्वेल्स् यांनी वाईकरांसाठी विशेष ऑफर्स सादर केल्या असून याला वाईकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
यावेळी खासदार नितीनकाका पाटील म्हणाले की, ‘‘चंदुकाका सराफ ज्वेल्स्च्या या सुवर्णदालनामुळे वाईच्या विकासाला गतीमानता मिळणार आहे. आजपर्यंत वाईकरांना दागिने खरेदीसाठी अन्य शहरांकडे जावे लागत होते. चंदुकाका सराफ ज्वेल्स्च्या सुवर्णदालनामुळे वाईकरांना आज त्यांच्या गावातच आपले आवडते दागिने खरेदी करायला मिळणार आहेत. चंदुकाका सराफ ज्वेल्स् आणि वाईकरांचे आधीपासूनच दृढ संबंध असून या सुवर्णदालनामुळे भविष्यात ते अधिक घट्ट होतील अशी मला आशा आहे.’’
यावेळी चंदुकाका सराफ ज्वेल्स्चे संचालक अतुल शहा म्हणाले की, महाराष्ट्र व कर्नाटक राज्य मिळून चंदुकाका सराफ ज्वेल्सचा कार्यविस्तार झाला असून समृध्द, ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक वारसा लाभलेल्या वाई येथे उद्घाटन होणारी चंदुकाका सराफ ज्वेल्स्ची ही सतरावी शाखा आहे. वाईसारख्या सुसंस्कृत शहरामध्ये आमची शाखा सुरू करताना आम्हांला विशेष आनंद होत आहे.’’
चंदुकाका सराफ ज्वेल्स यांच्यावतीने उदघाटनानिमित्त वाईकरांसाठी मेगा ड्रॉ ऑफर सादर केली असल्याची माहिती चंदुकाका सराफ ज्वेल्स्चे संचालक सिद्धार्थ शहा यांनी दिली. त्यानुसार 25 हजार रुपयांच्या पुढील दागिने खरेदीवर मेगा ड्रॉ द्वारे विविध आकर्षक बक्षिसे मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. यामध्ये 2 ज्युपिटर, 4 लॅपटॉप, 4 मोबाइल फोन जिंकण्याची संधी असल्याचे त्यांनी नमूद केले. आजपर्यंत लाखो ग्राहकांनी दिलेल्या विश्वासाला सार्थ ठरवत चंदुकाका सराफ ज्वेल्स् निरंतर वाटचाल करीत आहे. वाईकरांचे प्रेम व विश्वास वृध्दिंगत होईल, असा विश्वास यावेळी सिध्दार्थ शहा यांनी व्यक्त केला. चंदुकाका सराफ ज्वेल्स्च्या रबकवी (कर्नाटक) येथील शाखेचा शुभारंभ दि. 25 एप्रिल रोजी होत असल्याचे त्यांनी सांगतिले.