Satara : ‘चंदुकाका सराफ’मध्ये आज ज्युपिटर बाईक जिंकण्याची संधी

सातारा : अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर चंदुकाका सराफमध्ये सोने खरेदी करणे लाभदायक ठरणार आहे. अक्षय्य तृतीयेच्या सुवर्ण मुहूर्तावर उद्या दि. 30 एप्रिल रोजी 30 हजार रुपये व पुढील खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ज्युपिटर बाईक जिंकण्याची संधी मिळणार आहे. तसेच शुभ मुहूर्ताच्या खरेदीसाठी सोन्याच्या दागिन्यांवर देखील 2500 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत खास सूट देण्यात आली आहे.
तसेच सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर ग्राहकांना किमान 100 रुपये प्रति ग्रॅम सूट मिळणार आहे. त्याचप्रमाणे हिऱ्यांच्या दागिन्यांच्या घडणावळीवर 100 टक्केपर्यंत सूट देण्यात येणार आहे. आणि 0 टक्के घट जुन्या सोन्याच्या दागिन्यांवर आहे. चंदुकाका सराफ यांच्या सर्व स्टोअर्समध्ये हे लाभ ग्राहकांना घेता येतील.
तसेच प्रत्येक स्टोअरमध्ये 1 व बारामती स्टोअरमध्ये 2 ज्युपिटर बाइक्स जिंकण्याची संधी मिळणार आहे. या ऑफर्स केवळ अक्षय्य तृतीयेच्या दिवशी म्हणजेच 30 एप्रिल रोजीच लागू राहणार आहेत. शुभ मुहूर्ताच्या दागिने खरेदीसाठी आणि बाईक जिंकण्यासाठी आपल्या जवळच्या चंदुकाका सराफ स्टोअरला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन चंदुकाका सराफ प्रा. लि.चे चेअरमन किशोरकुमार शहा व संचालक सम्यक किशोरकुमार शहा यांच्यातर्फे करण्यात आले आहे.





