Satara : कोयनानगर येथे भूकंपग्रस्तांना दाखले वाटप

कोयनानगर : सहा दशकांपूर्वी कोयना खोर्यात झालेल्या विनाशकारी भूकंपाची झळ बसलेल्या पाटण तालुक्यातील भूकंपग्रस्त व त्याच्या वारसांना भूकंपग्रस्त दाखल्यांचे वाटप गुरुवारी करण्यात आले.
भूकंपग्रस्थांना शासकीय नोकरीकामी दाखले देण्यात येतात. संपूर्ण पाटण तालुका भूकंपप्रवण क्षेत्र असला तरी अनेकांनी भूकंपग्रस्त दाखले काढलेले नाहीत. त्यामुळे मागणीप्रमाणे भूकंपग्रस्त दाखले देण्याचे धोरण तालुका प्रशासनाने आखले आहे. प्रांताधिकारी सोपान टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार अनंत गुरव यांनी भूकंपग्रस्तांना दाखले देण्यासाठी विशेष मोहीम राबवली आहे.
त्यानुसार कोयनानगर येथे भूकंपग्रस्तांच्या स्मृती स्मारकाजवळ या दाखल्यांचे वाटप गुरुवारी करण्यात आले. प्रांताधिकारी सोपान टोम्पे, तहसीलदार अनंत गुरव, मंडलधिकारी संजय जंगम, कोतवाल जगन्नाथ सपकाळ, अरुण चाळके लहुराज कदम, आदी उपस्थित होते.





