Satara : कोळकीतील बडे नेते भाजपात दाखल

फलटण : फलटणचा विकास हाच माझा खरा ध्यास, अशी वचनपूर्ती करत असलेले माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोळकीमध्ये अनेकांनी राजे गटाला सोडचिठ्ठी देत आज भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी ग्रामविकासमंत्री ना.जयकुमार गोरे उपस्थित होते.
कोळकी गाव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे गाव म्हणून ओळखले जाते. या गावात राजे गटाचे सर्वच ठिकाणी राजकीय वर्चस्व होते. मात्र, तरीही सर्वसामान्य नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी भाजपचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे व पैलवान बाळासाहेब काशीद यांनी एकाकी खिंड लढवत कोळकी जिल्हा परिषद गटात लोकसभा व विधानसभा निवडणुकीत जयकुमार शिंदे यांनी चांगलेच मताधिक्य घेतले होते.
रविवारी कोळकीमध्ये राजे गटाला खिंडार पाडत जयकुमार शिंदेंनी भाजपचा कोळकी जिल्हा परिषद गट मजबूत केला आहे. यामध्ये कोळकी पंचायत समिती गणाचे माजी सदस्य सचिन रणवरे यांच्यासह कोळकी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच विकास नाळे ,राष्ट्रवादी युवक चे अध्यक्ष पैलवान संजय देशमुख ,युवा नेते किरण जाधव,सागर चव्हाण,सागर काकडे व इतर सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी राजे गटाला सोडून आज माजी खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ग्रामविकास मंत्री ना.जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीमध्ये भाजप मध्ये जाहीर प्रवेश केला.
यामुळे भारतीय जनता पक्षाच्या जुन्या कार्यकर्ते बळ मिळून भविष्यात ग्रामपंचायत ही भारतीय जनता पक्षाच्या विचाराची होऊ शकते. या प्रवेशामुळे कोळकी जिल्हा परिषद मतदार संघावर महायुती मध्ये भारतीय जनता पक्षाचा दावा नक्की होणार व आगामी जिल्हा परिषदेचे हा भारतीय जनता पक्षाच्या विचारांचा असेल, असा विश्वास जयकुमार शिंदे यांनी व्यक्त केला.
यावेळी भाजपचे युवा नेते अभिजीत नाईक निंबाळकर , पैलवान बाळासाहेब काशीद ,रणजीत जाधव, संदीप नेवसे ,उदयसिंह उर्फ बबलू निंबाळकर, यशवंत जाधव, अँड संदीप कांबळे, स्वागतशेठ काशिद , प्रदीप भरते, गणेश शिंदे, वैभव जाधव, धर्मराज देशपांडे, किरण पखाले, महेश गायकवाड ,सचिन हजारे, गोरख जाधव, विष्णुपंत फडतरे, महेश लाटे, सुधीर जगदाळे , गणेश मोरे, गणेश वणारे, गणेश वाकुडे उपस्थित होते.





