Satara : अनोळखी बेवारस मृतदेहाची ओळख पटवण्याचे आवाहन
नागठाणे : बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक बेवारस मृतदेह सापडला असून त्याबाबतची ओळख पटवण्याचे आवाहन बोरगाव पोलिसांनी केले आहे.
याबाबत बोरगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १७ एप्रिल रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास काशीळ (ता. सातारा ) गावच्या हद्दीतील शिवराजनगर येथे सातारा ते कराड जाणाऱ्या महामार्गाच्या सेवारस्त्यालगत अनोळखी पुरुष जातीचे अंदाजे ४५ वर्षे वयाच्या व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. मृतदेहाच्या अंगावर निळ्या तांबडया रंगाचा फुल बाह्याचा शर्ट, सँडो बनियान, निळसर पांढऱ्या रंगाची फुल पॅन्ट घातलेली आहे.
उजव्या दंडावर सिंहाचा चेहरा व डाव्या हाताच्या पोटरीवर इंग्रजी ‘P’ अक्षर गोंदलेले आहे. संबंधित इसमाबाबत कोणास काही माहिती असल्यास त्याबाबत बोरगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी संदीप वाळवेकर यांच्या ७७९८११८२५९ व उपनिरिक्षक सुधीर भोसले यांच्या ९८९०६२४५०१ या क्रमांकावर संपर्क साधवा असे आवाहन बोरगाव पोलीस ठाण्यातून करण्यात आले आहे.





