Satara : पशुपालकांनी पशुसंवर्धन विभागाच्या योजनांचा लाभ घ्यावा

सातारा : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजना राबवण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ घेऊन, पशुपालकांनी आपली आर्थिक उन्नती साधावी, असे आवाहन प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद यांनी केले आहे. या योजनांसाठी दि. 15 जूनअखेर ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
शेतीला जोडव्यवसाय म्हणून जिल्हास्तरीय योजनेंतर्गत 2 दुधाळ गायी, म्हशी गटवाटप, दहा अधिक एक शेळी गटवाटप, एकदिवसीय शंभर कुक्कुट पिल्ले गट, 25 अधिक 3 तलंगा गटवाटप या वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ देण्यात येत आहे. राज्यस्तरीय नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत सर्वसाधारण लाभार्थ्यांना 50 टक्के अनुदानावर व अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना 75 टक्के अनुदानावर दोन दुधाळ गायी किंवा म्हशींचा गट, सर्वसाधारण लाभार्थ्यांना 50 टक्के अनुदानावर व अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना 75 टक्के अनुदानावर 10 अधिक 1 शेळी गट, सर्व प्रवर्गातील लाभार्थ्यांना 50 टक्के अनुदानावर 25 अधिक 3 तलंगा गट, सर्व प्रवर्गातील लाभार्थ्यांना 50 टक्के अनुदानावर शंभर एकदिवसीय मिश्र पिल्ले गट, सर्वसाधारण लाभार्थ्यांना 50 टक्के अनुदान व अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना 75 टक्के अनुदानावर एक हजार मांसल कुक्कुट पक्षी संगोपनासाठी देण्यात येत असल्याचे विश्वास सिद यांनी सांगितले.
जिल्हास्तरीय विशेष घटक योजनेंतर्गत फक्त अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना 75 टक्के अनुदानावर दोन दुधाळ गायी, म्हशी गट वाटप करण्यात येत आहे. जिल्हास्तरीय विशेष घटक योजनेंतर्गत फक्त अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना 75 टक्के अनुदानावर 10 अधिक 1 शेळी गट वाटप करण्यात येत आहे. या योजनांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. शेतकर्यांच्या वेळ आणि आर्थिक बचतीसाठी गेल्या सात वर्षांपासून पशुसंवर्धन विभागाकडून ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यात येत आहेत.
यावर्षी दि. 3 मे ते 2 जून ऑनलाइन अर्ज स्वीकारणे, दि. 3 ते 7 जून रँडमायझेशन पद्धतीने लाभार्थ्यांची प्राथमिक निवड, दि. 8 ते 15 जून लाभार्थ्यांमार्फत कागदपत्रे अपलोड करणे, दि. 16 ते 24 जून पशुसंवर्धन अधिकार्यांमार्फत कागदपत्र पडताळणी, दि. 25 ते 27 जून लाभार्थ्यांमार्फत कागदपत्र त्रुटी पूर्तता, दि. 28 ते 30 जून कागदपत्रांची अंतिम पडताळणी आणि दि. 2 जुलै रोजी पात्र लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद पवार यांनी दिली.
पशुसंवर्धन विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी पशुपालकांनी हीींींिीं ://रह.ाीहरलाी.लेा या संकेतस्थळावर किंवा गुगल प्ले स्टोअरवरून -क.च-क-इचड या मोबाईल अॅपद्वारे अर्ज करावेत. याबाबत काही अडचण असल्यास नजीकचा पशुवैद्यकीय दवाखाना, पंचायत समितीतील पशुसंवर्धन विभाग अथवा टोल फ्री क्रमांक 1962 वर संपर्क साधावा.
– डॉ. विनोद पवार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी.





