Satara : लैंगिक अत्याचारप्रकरणी आरोपीस सात वर्षांची कैद

वाई कुडाळ : वाई तालुक्यातील एका गावच्या हद्दीत २०१३ मध्ये झालेल्या महिलेवरील लैंगिक अत्याचार केला होता. या प्रकरणी वाई न्यायालयाने आरोपी अमोल अशोक खरात (वय २७) याला सात वर्षाच्या कैदेची शिक्षा सुनावली आहे.
भुईज पोलीस ठाण्याचे तत्कालीन तपासी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक एन. व्ही. पवार यांनी याप्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलेले होते. या खटल्याची सुनावणी वाईचे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश आर. एन. मेहेरे यांच्या न्यायालयात पूर्ण झाली. सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता डी. एस. पाटील यांनी कामकाज पाहिले.
या केसमध्ये एकूण सात साक्षीदार तपासले. परिस्थितीजन्य पुरावा व साक्षीदारांच्या साक्षीवरुन न्यायाधीश आर. एन. मेहेरे यांनी आरोपी अमोल अशोक खरात याला दोषी ठरवून त्याला या गुन्ह्यात ७ वर्षे शिक्षा, ५०० रुपये दंड, दंड न भरल्यास १५ दिवस साधी कैद अशी शिक्षा सुनावली.
या केसमध्ये पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, उपअधीक्षक बाळासाहेब भालचीम यांच्या मार्गदर्शनाखाली भुईंज पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, तत्कालीन तपासी अंमलदार सपोनि एन. व्ही. पवार, पैरवी अंमलदार कॉ. घोरपडे, कॉ. आगम यांनी मदत केली.





