सातारा : कोयना धरणातून नदीपात्रात सोडणार १२,१०० कुसेक पाणी

पाणीसाठा झाला ९९.६३ टीएमसी; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
कोयनानगर : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पु मुसळधार पावसाची संततधार सुरूच असल्याने कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ होत आहॆ.धरण ९४ टक्के भरले असून एकूण पाणीसाठा ९९.६३ टीएमसी झाला आहे. धरणाची जलपातळी धोकादायक बनू नये यासाठी धरणातून नदीपात्रात आजपासून पाणी सोडण्यात येत आहे.
धरणाचा पायथा वीजगृह कार्यान्वित करुन पाणी सोडण्यात येईल. गत २४ तासात धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरूच आहॆ. कोयनानगर येथे १३६, नवजा १३९, महाबळेश्वर येथे १४२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहॆ. यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक ३८,२७१ कुसेक आहॆ.
धरणातील पाणीसाठा शतकाच्या उंबरठ्यावर असून धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी केवळ ७ टीएमसी पाणीसाठ्याची गरज आहॆ.
पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार कायमच असल्याने २४ तासात धरण पूर्ण क्षमतेने भरणार असल्याने धरणाच्या पायथा वीजगृहाबरोबर धरणाचे दरवाजे १ फूट ३ इंच उघडून त्यातून नदीपात्रात १२,१०० कुसेस्क पाणी सोडण्यात येणार आहॆ.





